नवी देहली – नवी देहलीतील पाकिस्तानी दूतावासात काम करणार्या एका भारतीय महिलेची पाकिस्तानी कर्मचारी मिन्हाज हुसेन याने छेड काढल्याचे समोर आले आहे. यापूर्वी पीडित महिलेने तिची छेड काढणार्या मिन्हाज हुसेन याच्या विरोधात दूतावासाचे उच्चायुक्त साद अहमद वाराईच यांच्याकडे तक्रार केली होती; पण त्यांनी हुसेन याला वाचवण्याचा प्रयत्न केला. (यावरून पाकिस्तानी अधिकार्यांची मानसिकता दिसून येते ! – संपादक) त्यानंतर पुन्हा हा प्रकार घडल्यानंतर पीडित महिलेने पोलिसांकडे धाव घेतली.
Pakistani Diplomat’s cook Minhaj Hussain booked for harassing an Indian woman
After an attempted molestation, the woman reported the incident to Charge d’Affaires, Saad Ahmad who quietly sent Hussain back to #Pakistan under the pretext of Bakri Eid
This shows the mentality of… pic.twitter.com/SwicTgb7pK
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) July 6, 2024
१. मिन्हाज हुसेन हा पाकिस्तानचे अधिकारी साद अहमद वाराईच यांचा स्वयंपाकी आहे. या ठिकाणी ही भारतीय महिला मदतनीस म्हणून काम करते. मिन्हाज हा फेब्रुवारीत पाकिस्तानमधून देहलीत पाकिस्तानी दूतावासात नोकरीसाठी आला. तेव्हापासून तो पीडितेची छेड काढत होता. तिच्यावर लैंगिक संबंधांसाठी दबाव टाकत होता.
२. या छळाला कंटाळून पीडित महिलेने २८ जून या दिवशी टिळकमार्ग पोलीस ठाण्यात मिन्हाज हुसेन याच्या विरोधात तक्रार प्रविष्ट केली. त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
३. यापूर्वी पाकिस्तानला जाणार्या एका प्राध्यापक महिलेकडे दूतावासातील कर्मचार्यांनी शारिरीक सुखाची मागणी केल्याचा आरोप करण्यात आला होता. (याचा अर्थ भारतातील पाकिस्तानी दूतावास हा वासनांधांचा अड्डा बनला आहे, हेच दिसून येते ! – संपादक)
संपादकीय भूमिकापाकमधून भारतातील दूतावासात काम करण्यासाठी येणारे पाकिस्तानी कर्मचारी भारतीय महिलेची छेड काढण्याचा दुःसाहस करतात, यावरून त्यांच्यातील उन्मत्तपणा दिसून येतो ! अशांना आजन्म कारावासात डांबून जन्माची अद्दल घडवणे आवश्यक ! |