उडुपीतील अत्तूरु चर्चकडून रस्त्यावर कमान उभारून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन !

अत्तूरु (उडुपी) – सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महामार्गाच्या रुंदीकरणासाठी उडुपी जिल्ह्यातील कमानी काढल्या जात असतांना उत्तूरु येथील सेंट लॉरेन्स चर्चची कमान मात्र तशीच राहिली. उलट चर्चने त्याच्या जुन्या लहानशा कमानीच्या जागी आता लोखंडाची मोठी कमान उभारून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केले आहे.

अधिकार्‍यांकडून कारवाई नाही !

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेत ही नवीन कमान उभारण्यात आली आहे.  या अनधिकृत बांधकामामुळे दळणवळण यंत्रणेत अडथळा निर्माण होत आहे. याविषयी तक्रार प्रविष्ट केली असतांनाही अधिकारी कोणतीही कारवाई न करता हात बांधून बसले आहेत. आता ‘हिंदु जागरण वेदीके’ या हिंदुत्वनिष्ठ संघटनेकडून या अनधिकृत कमानीच्या विरोधात लढा दिला जात आहे.

संपादकीय भूमिका 

  • एरव्ही देशात लोकशाही धोक्यात असल्याचा टाहो फोडणारे आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून लोकशाही व्यवस्थेचा उपमर्द करत आहेत, हे लक्षात घ्या !
  • कर्नाटकमध्ये काँग्रेसचे सरकार असल्यामुळे मुसलमानांसह आता ख्रिस्त्यांनाही कसलेच भय नाही, हेच अशा घटनांवरून दिसून येते !