१५ सहस्र नागरिक रहात असणार्‍या संकुलातील तुळशीचा कट्टा काढण्‍याची मुसलमानांची मागणी

  • बेंगळुरू येथील घटना

  • कट्टा न काढल्‍यास मशीद बांधण्‍याची अनुमती देण्‍याचीही मागणी

  • शिखांकडून गुरुद्वाराचीही मागणी

प्रतिकात्मक छायाचित्र

बेंगळुरू (कर्नाटक) – शहरातील अमानीकेरे येथे ३ सहस्र सदनिका असणार्‍या ‘प्रॉव्‍हिडंट वेलवर्थ सिटी अपार्टमेंट’ या संकुलामध्‍ये हिंदूंनी बांधलेल्‍या तुळशीसाठीच्‍या कट्ट्याला मुसलमानांनी विरोध करत तो काढून टाकण्‍याची मागणी केली आहे. तसे न केल्‍यास या परिसरात मशीद बांधण्‍याची अनुमती द्यावी, अशी मागणी केली आहे. या मागणीमुळे येथे रहाणार्‍या शिखांनीही गुरुद्वारा बांधण्‍याची अनुमती मागितली आहे. यामुळे सध्‍या या संकुलात तणावाची स्‍थिती निर्माण झाली आहे. या प्रकरणी मुसलमानांकडून जिल्‍हाधिकार्‍यांकडे तक्रार करण्‍यात आली आहे. या संकुलात सध्‍या १५ सहस्र लोक रहातात. या संदर्भात जिल्‍हाधिकारी कार्यालयातून एक पथक येऊन संकुलाला भेट देणार आहे.

संपादकीय भूमिका 

कर्नाटकमध्‍ये काँग्रेसचे सरकार आल्‍यापासून धर्मांध मुसलमान उद्दाम झाले आहेत. त्‍यांच्‍या लेखी हिंदू काफीर असून त्‍यांना नष्‍ट करण्‍याचे त्‍यांना शिकवले जात असल्‍यामुळेच सर्वत्र अशी स्‍थिती निर्माण होते. ही स्‍थिती पालटण्‍यासाठीच हिंदु राष्‍ट्राची आवश्‍यकता आहे !