अनेक थोर संत-महात्म्यांच्या अथक प्रयत्नांमुळे वर्ष २००६ पासून चालू असलेला माझा महामृत्यूयोग वेळोवेळी टळून मला नवजीवन लाभत आहे ! – परात्पर गुरु डॉ. आठवले

‘हिंदु राष्ट्र-स्थापनेच्या कार्यातून साधना कशी करावी ?’, याविषयी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी हिंदुत्वनिष्ठांना केलेले मार्गदर्शन !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘सर्व देवाच्या इच्छेने होते’, यावर श्रद्धा असली की, मग मृत्यूचे भय वाटत नाही.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले     

 

२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा महामृत्यूयोग टळावा, यासाठी अनुष्ठान करून त्यांचे रक्षण करणारे थोर संतमहात्मे !

योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन

२ अ. पूर्वपरिचय नसतांना वर्ष २००४ मध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासाठी अनुष्ठान करून वर्ष २००६ मधील त्यांचा संभावित महामृत्यूयोग टाळणारे योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन (वय १०० वर्षे) !

२ अ १. योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांनी भविष्यातील घडामोडींचा अचूक वेध घेऊन त्याविषयी अगोदरच लिहून ठेवणे : कल्याण (ठाणे) येथील योगतज्ञ दादाजी वैशंपायन एक फार मोठे सिद्धपुरुष होते. वर्ष २००४ मधील गोष्ट आहे. तेव्हा ते कॅनडामध्ये होते. ‘त्यांना भविष्यात काय होणार आहे’, हे सर्व ठाऊक होते. त्यांना जे ज्ञान मिळते, ते सांगण्याची त्यांची एक विशिष्ट पद्धत होती. त्यांना मिळालेले ज्ञान ते एका कागदावर लिहून तो कागद एका बंद लखोट्यात ठेवायचे. नंतर तो लखोटा पोस्टाने त्यांच्या एखाद्या भक्ताच्या घरी पाठवायचे.

२ अ २. ‘वर्ष २००६ अथवा २००७ मध्ये सनातन संस्थेचे संस्थापक डॉ. आठवले यांचा मृत्यू होणार आहे’; पण ‘मी त्यांना जिवंत ठेवणार आहे’, असे योगतज्ञ दादाजींनी वर्ष २००४ मध्ये लिहून ठेवणे : वर्ष २००४ मध्ये त्यांनी लिहून ठेवले होते, ‘सनातन संस्था’ नावाची एक संस्था आहे. तिचे संस्थापक डॉ. आठवले आहेत. वर्ष २००६ अथवा २००७ मध्ये त्यांचा मृत्यू होणार आहे.’ पुढे हेसुद्धा लिहिले होते, ‘मी (योगतज्ञ दादाजी) अनुष्ठान करून डॉ. आठवले यांना जिवंत ठेवणार आहे.’ वर्ष २००७ मध्ये त्यांचे १५०० ते २००० भक्त एकत्र आले असतांना ते पत्र उघडले गेले. योगतज्ञ दादाजींच्या एका भक्ताने ते पत्र वाचले. पत्रात लिहिले होते, ‘सनातन संस्था’ नावाची एक संस्था आहे.’ त्या वेळी योगतज्ञ दादाजींनी आपल्या भक्तांना विचारले, ‘‘सनातन संस्थे’चे नाव कुणी ऐकले आहे का ?’’ २ – ३ भक्तांनी हात वर केला. तेव्हा त्यांनी सांगितले, ‘‘संस्थेत दूरभाष करून विचारा की, ‘डॉ. आठवले जिवंत आहेत कि नाहीत ?’’ त्या वेळी माझा खरोखरंच मृत्यू होणार होता; परंतु मी जिवंत रहावे; म्हणून योगतज्ञ दादाजींनी अनुष्ठान केले होते.

२ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा मृत्यूयोग टळावा, यासाठी ३ वर्षे पूर्ण रात्रभर अनुष्ठान करणारे आणि ‘अंतिम श्वासापर्यंत अनुष्ठान करत राहीन’, असे सांगणारे प.पू. परुळेकर महाराज !

प.पू. परूळेकर महाराज

गोव्याच्या जवळच सिंधुदुर्ग जिल्ह्यात प.पू. परुळेकर महाराज हे संत रहायचे. ते जन्मापासूनच अंध होते. मी त्यांना भेटायला जायचो, तेव्हा अंध असूनही ते मला ओळखायचे. मी गाडीतून उतरल्यावर ते धावत यायचे आणि म्हणायचे, ‘‘या डॉक्टर !’’ संतांचे प्रेमच खरे प्रेम असते. वर्ष २०१२ मध्ये मला त्यांचा दूरभाष आला.

२ आ १. प.पू. परुळेकर महाराज यांनी दूरभाष करून परात्पर गुरु डॉक्टरांच्या प्रकृतीची चौकशी करणे आणि ‘त्यांच्यासाठी करत असलेले अनुष्ठान चालू ठेवू का ?’, असे विचारणे  

प.पू. परुळेकर महाराज : आपली प्रकृती कशी आहे ?

परात्पर गुरु डॉ. आठवले : मी भिंतीचा आधार घेत हळूहळू चालतो. गेली १० – १२ वर्षे मी आश्रमाच्या बाहेर कुठेही जाऊ शकलो नाही.

प.पू. परुळेकर महाराज : मी आपल्यासाठी अनुष्ठान करत आहे. ते चालू ठेवू का ?

परात्पर गुरु डॉ. आठवले : केव्हापासून अनुष्ठान करत आहात ?

२ आ २. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या संभाव्य मृत्यूविषयी कळल्यावर प.पू. परुळेकर महाराज यांनी ३ वर्षे रात्रभर अनुष्ठान करणे

प.पू. परुळेकर महाराज : ‘वर्ष २००९ मध्ये आपला मृत्यू होणार आहे’, असे मला कुणीतरी सांगितले होते. त्यामुळे वर्ष २००९ पासून मी आपल्यासाठी अनुष्ठान करत आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले : आपण हे अनुष्ठान केव्हा करता ?

प.पू. परुळेकर महाराज : दिवसा माझे भक्त भेटायला येतात. त्यामुळे मला वेळ मिळत नाही. त्यामुळे मी रात्री अनुष्ठान करतो.

परात्पर गुरु डॉ. आठवले : आपण रात्री किती घंटे अनुष्ठान करता ?

प.पू. परुळेकर महाराज : मी संपूर्ण रात्रभर अनुष्ठान करतो. माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी आपल्यासाठी अनुष्ठान करत राहीन !

प.पू. परुळेकर महाराज अनुष्ठान करण्यासाठी ३ वर्षे झोपलेच नव्हते. संतांचे कार्य असे असते. पती-पत्नीमध्ये कितीही प्रेम असले, तरी ३ वर्षे काय, ते दुसर्‍यासाठी एक रात्रतरी झोपल्याविना राहू शकतात का ?

(समाप्त)