संत तुकाराम महाराज पालखी सोहळा

  • २८.६.२०२४ पालखीचे प्रस्थान आणि इनामदार वाड्यात पहिला मुक्काम
  • २९.६.२०२४ आकुर्डी येथील श्री विठ्ठल मंदिरात दुसरा मुक्काम
  • ३०.६.२०२४ आणि १.७.२०२४ पुण्यात नाना पेठेतील श्री निवडुंगा विठ्ठल मंदिरात मुक्काम
  • २.७.२०२४ लोणी काळभोरकडे रवाना
  • ३.७.२०२४ यवत येथील भैरवनाथ मंदिर पालखी तळावर मुक्काम
  • ४.७.२०२४ वरवंड येथील विठ्ठल मंदिरात मुक्काम
  • ५.७.२०२४ उंडवडी गवळ्याची येथे मुक्काम
  • ६.७.२०२४ बारामती शारदा विद्यालयाच्या प्रांगणात मुक्काम
  • ७.७.२०२४ सणसर येथे मुक्काम
  • ८.७.२०२४ बेलवडी येथे पहिले रिंगण होईल आणि आंथुर्णे येथे मुक्काम
  • ९.७.२०२४ निमगाव केतकी येथे मुक्काम
  • १०.७.२०२४ इंदापूर येथे दुसरे गोल रिंगण
  • १२.७.२०२४ सकाळी महाराजांच्या पादुकांना सराटी येथे नीरा नदीत स्नान घालून पालखी पुढे अकलूजकडे मार्गस्थ होईल आणि तेथे दुपारी तिसरे गोल रिंगण
  • १३.७.२०२४ माळीनगर येथे पहिले उभे रिंगण, त्यानंतर बोरगावला मुक्काम
  • १४.७.२०२४ सायंकाळी तोंडले बोंडले येथे धावा होईल आणि पिराची कुरोली येथे मुक्काम
  • १५.७.२०२४ सायंकाळी बाजीराव विहीर येथे दुसरे उभे रिंगण
  • १६.७.२०२४ सकाळी वाखरी येथून पंढरपूरकडे प्रस्थान. सायंकाळी पादुका आरतीस्थळी शेवटचे आणि तिसरे उभे रिंगण.