सनातन संस्था आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावरील विश्वास दर्शवणारे एका हिंदुत्वनिष्ठ संघटनेच्या अध्यक्षांचे गौरवोद्गार !

सनातन संस्था ही सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटनांची मातृसंस्था असून सध्या हिंदु राष्ट्राविषयीच्या कृती गुरुजींचा (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा) आशीर्वाद आणि कृपा यांमुळेच होत आहेत !

श्री. विश्वनाथ कुलकर्णी

​ ‘वाराणसी येथे एका हिंदुत्वनिष्ठाने हिंदुत्वनिष्ठ संघटनांची बैठक आयोजित केली होती. बैठकीच्या अंती एका हिंदुत्वनिष्ठ संघटनेच्या अध्यक्षांनी सर्वांशी अनौपचारिकपणे संवाद साधला. त्या वेळी त्यांनी सांगितले, ‘‘आपण सर्व जण वेगवेगळ्या संस्थांशी जोडले गेलो आहोत; परंतु आपण सर्वांनी हे मान्य करायला हवे की, आपल्या सर्वांची मातृसंस्था ही सनातन संस्था आहे. आज हिंदु राष्ट्राविषयी जी काही कृती होत आहे, ती गुरुजींचा (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा) आशीर्वाद आणि कृपा यांमुळेच होत आहे.’’ यावरून ‘समाजातील संस्थांचा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले आणि सनातन संस्था यांच्यावर किती विश्वास आहे !’, हे माझ्या लक्षात आले.’

– श्री. विश्वनाथ कुलकर्णी (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के)(समन्वयक, हिंदु जनजागृती समिती, उत्तरप्रदेशचा पूर्वेकडील भाग आणि बिहार), वाराणसी, उत्तरप्रदेश. (२९.७.२०२३)