‘ॐ’काराच्या उच्चारणाचे लाभ

शारीरिक लाभ

१. विविध रोगांवर उपयुक्त !

फुफ्फुसांची ताकद वाढते. दम्याचा त्रास, तसेच श्वसनाचे त्रास न्यून होतात. धाप लागण्याचे प्रमाण अल्प होते. रक्तदाबाचा त्रास, ‘थायरॉईड’, हार्मोनल संतुलन, महिलांच्या काही समस्या आदी सर्व त्रास अल्प होण्यास साहाय्य होते. त्या त्या व्याधीनुसार ‘ॐ’चे उच्चारण कसे करायचे हे तज्ञांकडून शिकून घ्यावे लागते.

काही व्याधींनुसारही वेगवेगळ्या प्रकारे ‘ॐ’कार म्हटल्याने त्या त्या व्याधींवर त्याचा लाभ होतो.

– मनाली देव (दैनिक ‘सकाळ’, २१ मार्च २०२३)

२. काही प्रमाणात रक्तदाब नियंत्रित होण्यास साहाय्य होते.

– डॉ. सई खर्डीकर, होमिओपॅथी तज्ञ आणि योगशिक्षिका (‘जस्ट फॉर हार्ट्स’ ध्वनीचित्रफीत)

३. वायूंवर नियंत्रण मिळवल्याने संबंधित भागाचे कार्य सुधारणे !

‘ॐ’काराच्या नियमित उच्चारणाने अनेक रोगांपासून मुक्तता होते, असे संशोधन झाले आहे. शरिरातील अनेक अवयव नियंत्रित करणारे ३ ‘प्राण’ यामुळे वाढतात.

उदान वायु गळ्याच्या ठिकाणी असतो. त्यामुळे शीर आणि मुख यांमधील सर्व अवयव चांगले रहातात. प्राणवायूचे छातीच्या भागावर वर्चस्व असते. समान वायू पचनक्रियेच्या जागी पोटात असतो. अशा प्रकारे या सर्व ठिकाणच्या अवयवांचे कार्य ॐकाराच्या उच्चाराने सुधारते. (संदर्भ :‘प्रशांतजे योगा’ ध्वनीचित्रफीत)

४. ‘ॐ’काराच्या कंपनांमुळे पियुष ग्रंथीला उत्तेजना मिळून संपूर्ण शरिरातील अंतःस्रावी ग्रंथीचे कार्य सुधारते. पर्यायाने थायरॉईड आणि मधुमेह या आजारांचे संतुलन होते. हृदय, मेंदू अशा महत्त्वाच्या अवयवांचे काम सुधारते.

(संदर्भ : दैनिक ‘पुढारी’, ७ मार्च २०२४)

५. स्वरयंत्राचे स्नायू बळकट होणे

विशिष्ट पद्धतीने प्रतिदिन ‘ॐ’कार म्हटल्यास स्वरयंत्राचे स्नायू बळकट होतात. अनेक गायक आणि वक्ते ‘ॐ’कार साधना करतात.

(संदर्भ : दैनिक ‘तरुण भारत’, २३ नोव्हेंबर २०१८)

मानसिक लाभ

१. मनाचे संतुलन चांगले राहून सकारात्मक ऊर्जा मिळणे !

‘ॐ’कार साधनेमुळे मानसिक शांतता मिळते. सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. ती आपल्या विचारांमध्ये उतरते. त्यातून ती कृतीत उतरते. नकारात्मकता, वाईट विचार, ताणतणाव, भीती, नैराश्य न्यून होते. चिडचिड न्यून होते.

– मनाली देव (दैनिक ‘सकाळ’, २१ मार्च २०२३)

२. ताण न्यून होणे

आजकाल विद्यार्थ्यांपासून वृद्धांपर्यंत सर्वांना कुठला ना कुठला ताण असतो. कामाच्या ठिकाणीही अपेक्षित ध्येय साध्य करणे आदी अनेक प्रकारचे ताण असतात. ‘ॐ’कारामुळे ताण न्यून होण्यास साहाय्य होते.

– मनाली देव (दैनिक ‘सकाळ’, २१ मार्च २०२३)

३. चिंता, चंचलता, नैराश्य आदी मनोविकार न्यून होणे

मानसिक त्रास, चिंता (‘एन्झायटी’) असणार्‍यांनी ‘ॐ’काराचे उच्चारण केल्यास त्यांना लाभ होतो. मनाची चंचलता न्यून होते. मनाची अस्वस्थता न्यून होते. मन शांत आणि एकाग्र झाल्याने भावना संतुलित रहातात. ‘फोबिया’ (वस्तू, परिस्थिती, क्रिया आदींविषयीची भीती), नैराश्य (‘डिप्रेशन’) न्यून व्हायला साहाय्य होते.

(संदर्भ : दैनिक ‘पुढारी’, ७ मार्च २०२४)

४. एकाग्रता वाढणे आणि विद्यार्थ्यांना अभ्यासात लाभ होणे

अ. विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये ‘ॐ’कार म्हणण्याचा विशेष लाभ होतो. एकाग्रता वाढण्याचा लाभही ‘ॐ’कारामुळे होतो.

– मनाली देव (दैनिक ‘सकाळ’, २१ मार्च २०२३)

आ. बर्‍याच मुलांना अभ्यास लक्षात रहात नाही किंवा अभ्यास करूनही पेपर लिहितांना आठवत नाही. ‘ॐ’कारामुळे विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती वाढते. बुद्ध्यांक वाढायलाही साहाय्य होते. – डॉ. सई खर्डीकर, होमिओपॅथी तज्ञ आणि योगशिक्षिका (‘जस्ट फॉर हार्ट्स’ ध्वनीचित्रफीत)

आध्यात्मिक लाभ

१. शरिरातील ऊर्जा आणि चैतन्य वाढते. ‘ॐ’काराने व्यक्तीमधील सकारात्मक ऊर्जा आणि सात्त्विकता वाढते. आजूबाजूचे वातावरण सकारात्मक होते. मन आनंदी होते. आध्यात्मिक प्रगतीसाठी ही साधना उपयुक्त असून त्यामुळे एकाग्रता वाढते. मनावरील संयम वाढतो. ध्यान-धारणा करण्यासाठीची बैठक सिद्ध होते.

– मनाली देव (दैनिक ‘सकाळ’, २१ मार्च २०२३)

२. ‘ॐ’च्या जपाने साधकाला उन्मनी अवस्था प्राप्त होऊ शकते. विषयावरचे मन अधिकाधिक अंतिम सत्याच्या शोधाकडे जाते