मानवी हक्क शिक्षणक्रमाचा निकाल घोषित

मुक्त विद्यापिठाच्या पत्रकारिता आणि मानवी हक्क अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ साठीचे प्रवेश चालू

रत्नागिरी – यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापिठाच्या परीक्षा माहे मे/जून २०२४ चे निकाल घोषित झाले आहेत. या मध्ये मानवी हक्क कोर्सचे निकाल घोषित झाले असून रत्नागिरी येथील विद्यापिठाचे अधिकृत अभ्यासकेंद्र रत्नभूमी जर्नालिजम इन्स्टिट्यूट चा मानवी हक्क अभ्यासक्रमाचा निकाल १०० टक्के लागला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातून पत्रकारिता पदविका अभ्यासक्रमासाठी एकूण १४ विद्यार्थी बसले होते. यातील सर्व विद्यार्थी चांगल्या गुणांसह उत्तीर्ण झाले आहेत. या अभ्यासक्रमात रत्नागिरी जिल्ह्यामधून सौ. माधुरी जनार्दन गमरे (८४ टक्के) या प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या आहेत, तर द्वितीय क्रमांक श्री. समीर बाळू घडशी (८३.६७ गुण) आणि श्री. नामदेव आनंदा जाधव (८२ टक्के गुण) हे तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. मानवी हक्क अभ्यासक्रमातील सर्व विद्यार्थी प्रथम वर्गात उत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थ्यांना मिळालेल्या यशाबद्दल रत्नभूमी जर्नालिजम इन्स्टिट्यूटच्या प्रमुख श्रीमती धनश्री धनंजय पालांडे आणि सेंटरचे केंद्रसंयोजक अंकुश अशोक कदम यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.


पत्रकारिता पदविका आणि मानवी हक्क शिक्षणक्रम अभ्यासक्रमांचे नवीन बॅचसाठीचे प्रवेश प्रक्रिया चालू

पत्रकार होण्यासाठी उपयुक्त असणारा पत्रकारिता पदविका अभ्यासक्रम हा १२ वी उत्तीर्ण, १२ वी समकक्ष कोणताही शासनमान्य कोर्स, तसेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापिठाचा पूर्वतयारी अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेल्यांना या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळेल. तसेच मानवी हक्क शिक्षणक्रमासाठी १० वी उत्तीर्ण, तसेच १० वी समकक्ष कोणताही शासनमान्य कोर्स, तसेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापिठाचा पूर्वतयारी अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेल्यांना या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळेल.

या कोर्सच्या प्रवेशप्रक्रिया संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी मुक्त विद्यापिठाचे अधिकृत अभ्यासकेंद्र रत्नभूमी जर्नालिजम इन्स्टिट्यूट, ३/२०८, रत्नभूमी बिल्डिंग, पत्रकार कॉलनी, रेल्वे स्टेशनसमोर, कुवारबाव, रत्नागिरी.

ई-मेल – [email protected]  संपर्क क्र. ९७६३०४७७८७, ९९२१८७९६६०, येथे संपर्क साधावा.