महाविद्यालयात हिजाब घालता येण्‍यासाठी मुसलमान विद्यार्थिनींची उच्‍च न्‍यायालयात याचिका !

आचार्य महाविद्यालय (चेंबूर) येथील घटना !

प्रतिकात्मक चित्र

मुंबई – चेंबूर येथील ना.ग. आचायर्र् आणि दा.कृ. मराठे महाविद्यालयाने महाविद्यालयाच्‍या परिसरात धार्मिक वस्‍त्रे परिधान न करण्‍याचा नियम घातला होता; मात्र महाविद्यालयातील काही विद्यार्थिनींनी याला विरोध दर्शवला. ‘महाविद्यालयाला नियम रहित करण्‍याचा आदेश द्यावा आणि महाविद्यालयात हिजाब घालून जायला अनुमती मिळावी’, अशी मागणी त्‍यांनी उच्‍च न्‍यायालयात प्रविष्‍ट केलेल्‍या याचिकेत केली आहे.

१. मागील वर्षी महाविद्यालयाने कनिष्‍ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्‍यांसाठी महाविद्यालयाच्‍या परिसरात धार्मिक वस्‍त्रे परिधान करण्‍यावर बंदी घातली होती. त्‍या अंतर्गत हिजाबवरही बंदी होती; मात्र मुसलमान विद्यार्थिनींनी याला विरोध दर्शवला होता.

२. या वर्षी कनिष्‍ठ महाविद्यालयासह द्वितीय आणि तृतीय वर्षातील विद्यार्थ्‍यांसाठीही धार्मिक वस्‍त्रे परिधान न करण्‍याचा नियम महाविद्यालयाने लागू केला आहे. यावर्षीही मुसलमान विद्यार्थिनींनी याला विरोध केला असून या प्रकरणी मानवाधिकार आयोगाकडेही तक्रार केली आहे.

संपादकीय भूमिका :

अन्‍य धर्मीय त्‍यांच्‍या धर्माशी निगडित असलेल्‍या गोष्‍टींच्‍या संदर्भात किती कट्टर असतात, हे यावरून लक्षात येते !