गणवेश टक्‍केवारीत अडकल्‍याने विद्यार्थ्‍यांना मिळाले नाहीत ! – अंबादास दानवे, विरोधी पक्षनेते, विधान परिषद

अंबादास दानवे, विरोधी पक्षनेते

छत्रपती संभाजीनगर – राज्‍यात ४८ लाख शालेय विद्यार्थ्‍यांना शाळेच्‍या पहिल्‍या दिवशी गणवेशाचे वाटप केले जाईल, असे राज्‍यशासनाने घोषित केले होते; परंतु विद्यार्थ्‍यांना १५ जून या दिवशी गणवेश मिळाले नाहीत. यामागे राज्‍यशासनाचे टक्‍केवारीचे अर्थकारण आहे. ‘गणवेश टक्‍केवारीत अडकल्‍याने ते विद्यार्थ्‍यांना मिळाले नाहीत’, असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी १५ जून या दिवशी पत्रकार परिषदेत केला.

ते पुढे म्‍हणाले की, गुत्तेदार, टक्‍केवारीसाठी शासन चालते का ? विद्यार्थ्‍यांना गणवेश द्यायचे होते, तर मे महिन्‍यात सिद्ध करून शाळांना पाठवले असते; मात्र ‘सर्वच अधिकार आमच्‍याकडे पाहिजेत’, या भूमिकेतून सरकारचे काम चालू आहे. यापूर्वी विद्यार्थ्‍यांना गणवेश देण्‍याची जी पद्धत चालू होती, तीच पद्धत चालू ठेवली पाहिजे. जिल्‍हा परिषद, स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍था यांना रंग, परंपरा जपण्‍याचे स्‍वातंत्र्य असले पाहिजे.