४ धर्मांधांच्या विरोधात ‘पोक्सो’ अंतर्गत गुन्हा नोंद !
पुणे – घराबाहेर थांबलेल्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीसमवेत असभ्य वर्तन करून तिचा विनयभंग केला. याचा जाब विचारणार्या वडिलांना मारहाण करून चाकूचा धाक दाखवत जिवे मारण्याची धमकी दिली, तसेच मुलीविषयी अश्लील बोलून तिला पळवून नेण्याची धमकी दिली. ही घटना गुलटेकडी परिसरामध्ये घडली. या प्रकरणी अल्पवयीन मुलीने स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे. त्यानुसार भुर्या उपाख्य मुस्ताफा खान, रजाक सय्यद, इरफान बागी आणि फारूक अन्सारी यांच्याविरुद्ध ‘पोक्सो’ कायद्यांतर्गत गुन्हा नोंद केला आहे.
मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी जाब विचारण्यास गेलेल्या वडिलांना भुर्याने चाकू दाखवून जिवे मारण्याची धमकी देत शिवीगाळ केली. इतर आरोपींनी वडिलांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून घायाळ केले. ‘तुमची मुलगी पुष्कळ सुंदर आहे. तिला आतापण आम्ही पळवून घेऊन जाऊ’, अशी धमकी दिल्याचे तक्रारीमध्ये नमूद केले आहे. (यातून धर्मांधांची मजल कुठपर्यंत गेली आहे, हे लक्षात येते. अशा धर्मांधांना शरियतच्या कायद्यानुसार भर चौकात दगडाने ठेचून मारण्याची शिक्षा द्यावी, अशी मागणी कुणी केल्यास आश्चर्य वाटू नये ! – संपादक)