पवई (मुंबई) येथे अनधिकृत झोपडपट्टी हटवण्यासाठी गेलेल्या अधिकार्‍यांवर दगडफेक !

५-६ पोलीस कर्मचारी घायाळ

मुंबई – पवई येथील हिरानंदानी भागातील अनधिकृत झोपडपट्टयांवर कारवाईसाठी गेलेले मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी आणि पोलीस यांच्यावर झोपडपट्टीवासियांनी दगडफेक केली. या वेळी पोलिसांनीही सौम्य लाठीमार केला. ६ जून या दिवशी अनधिकृत झोपडपट्टयांवर कारवाई करतांना दगडफेकीची घटना घडली होती. दगडफेकीनंतर झोपडपट्टयांवरील कारवाई थांबवण्यात आली आहे. दगडफेकीत ५-६ पोलीस कर्मचारी घायाळ झाले. या प्रकारानंतर पवई भागात मोठ्या प्रमाणात पोलीस पहारा ठेवण्यात आला असून अद्यापही तणावाचे वातावरण आहे.

संपादकीय भूमिका

अशांना कायदा-सुव्यवस्थेचा धाकच उरला नसल्याचे दर्शवणारी घटना !