ताज हॉटेल आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ बाँबने उडवू !

मुंबई पोलिसांना पुन्हा एकदा धमकी !

प्रतिकात्मक चित्र

मुंबई – मुंबईतील ताज हॉटेल आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ बाँबच्या साहाय्याने उडवू, अशी धमकी मुंबई पोलिसांना देण्यात आली आहे. २७ मे या दिवशी सायंकाळी मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला संपर्क करून ही धमकी देण्यात आली. हा भ्रमणभाष उत्तरप्रदेशातून आला होता. या धमकीनंतर पोलीस प्रशासन सतर्क झाले. मुंबई पोलिसांनी या घटनेची गांभीर्याने नोंद घेत ताज हॉटेल आणि विमानतळ या ठिकाणची पहाणी केली; मात्र तेथे कुठलीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. फेब्रुवारी २०२४ मध्ये मुंबईत ६ ठिकाणी बाँब ठेवण्यात आल्याचा संदेश मुंबई पोलिसांना मिळाला होता.

संपादकीय भूमिका :

अशा प्रकारे धमक्या वारंवार मिळणे हे कायद्याचा धाक नसल्याचे लक्षण !