श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्यातील देवीतत्त्वाची साधिकेला आलेली अनुभूती

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

१. श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या वाढदिवसाच्या दिवशी साधिकेचा ‘श्रीचित्‌शक्ति’ असा नामजप आपोआप चालू होणे

‘२५.१२.२०२३ या दिवशी श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचा वाढदिवस होता. त्या दिवशी पहाटे जाग येताच माझा ‘श्रीचित्‌शक्ति’ असा नामजप आपोआप चालू झाला. त्यानंतर मी आमच्या घराच्या शेजारी असलेल्या श्री महालक्ष्मीच्या मंदिराभोवती चालण्याचा व्यायाम करायला गेले. त्या वेळीही माझा तोच नामजप चालू होता.

सौ. ज्योती सुदिन ढवळीकर

२. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना ‘श्रीसत्‌शक्ति’ अन् ‘श्रीचित्‌शक्ति’ असे संबोधण्यास सांगण्यामागील कार्यकारणभाव लक्षात येणे

थोड्या वेळाने मला श्री महालक्ष्मी मंदिराच्या प्रांगणात सर्वत्र श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांची अनेक रूपे दिसू लागली. श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी निळ्या रंगाची साडी परिधान केली होती. काही वेळाने मला त्यांच्या अनेक रूपांमध्ये मधूनच श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचे रूप दिसत होते. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी लाल रंगाची साडी परिधान केली होती. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ या देवीच्या रूपात माझ्यासमोर आल्या. मी पूर्णपणे या भावविश्वात रमून गेले. ‘महर्षींनी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना ‘श्रीसत्‌शक्ति’ अन् ‘श्रीचित्‌शक्ति’ असे संबोधण्यास का सांगितले आहे ?’, हे माझ्या लक्षात आले.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ या दोघींमधील जागृत देवीतत्त्वाची अन् त्यांच्यातील एकरूपतेची अनुभूती दिल्याबद्दल सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या चरणी कोटीशः प्रणाम !’

– सौ. ज्योती सुदिन ढवळीकर (वर्ष २०२३ मधील आध्यात्मिक पातळी ६९ टक्के, वय ६३ वर्षे), बांदिवडे, गोवा. (२५.१२.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक