परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे चित्र रेखाटतांना आणि रेखाटल्यावर पनवेल येथील श्री. सिद्धेश सूर्यकांत परब यांना जाणवलेली सूत्रे

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवासाठी मी आई-वडिलांच्या समवेत गोवा येथे गेलो होतो. ब्रह्मोत्सव पाहून घरी आल्यानंतर माझ्या मनात विचार आला, ‘गुरुदेवांचे (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे) एक चित्र काढूया.’ १३.५.२०२३ या दिवशी मी गुरुदेवांचे चित्र रेखाटले.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे (मूळ छायाचित्र )
परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे रेखाटलेले छायाचित्र

चित्र जसजसे पूर्ण होत होते, तसतसे ते सजीव वाटत होते. मला चित्रात चैतन्य जाणवले. चित्र पाहिल्यावर ‘गुरुदेव घरी आले आहेत’, असे मला जाणवले. प्रत्यक्षात मी गुरुदेवांना माझ्या लहानपणी पाहिले होते.

गुरुदेवांचे स्मितहास्य पाहून मला चैतन्य जाणवत होते. घरात असलेल्या अन्य चित्रांपेक्षा गुरुदेवांचे चित्र लक्षवेधक होते.’

– श्री. सिद्धेश सूर्यकांत परब, नवीन पनवेल, जिल्हा रायगड. (२९.१२.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक