Dowry Allahabad HC : हुंडा मागणे, हा गुन्हा; मात्र कमी हुंडा दिला म्हणून टोमणे मारणे, हा गुन्हा नाही ! – अलाहाबाद उच्च न्यायालय

प्रयागराज (उत्तरप्रदेश) – हुंडा मागणे, हा दंडनीय गुन्हा असला, तरी कमी हुंडा दिला; म्हणून टोमणे मारणे, हा दंडनीय गुन्हा नाही, असे अलाहाबाद उच्च न्यायालयाने एका खटल्याच्या सुनावणीच्या वेळी म्हटले. ‘फौजदारी खटला चालवण्यासाठी कुटुंबातील सदस्यांवरील आरोप स्पष्ट असले पाहिजेत. प्रत्येक सदस्याने बजावलेल्या विशिष्ट भूमिकांवर प्रकाश टाकला पाहिजे’, असे न्यायालयाने म्हटले.

आरोपीने (पतीने) हुंडा म्हणून गाडीची मागणी केली आणि त्याची ही मागणी पूर्ण न झाल्याने फिर्यादीला (पत्नीला) घरातून हाकलून दिले. या प्रकरणी भारतीय दंड संहितेचे कलम ४९८अ, ३२३, ५०६ आणि हुंडा बंदी कायद्याच्या कलम ३, ४ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता.