श्री. सीताराम (नाना) आग्रे यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या वेळी झालेल्या रथोत्सवाच्या वेळी आलेली अनुभूती !

श्री. सीताराम आग्रे
श्री. सीताराम आग्रे

१. रथामध्ये बसलेले परात्पर गुरु डॉ. आठवले यांना पाहिल्यावर साक्षात् भगवान श्रीकृष्ण बसले असल्याचे जाणवणे

‘२२.५.२०२२ या दिवशी सकाळपासूनच वातावरण आनंदमय झाले होते. प्रत्येक जण मिरवणुकीच्या वेळेची वाट पहात होता. जेव्हा मिरवणुकीच्या स्वागतासाठी मला उभे केले गेले, तेव्हा मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे दुरूनच दर्शन झाले. तेव्हा ‘रथामध्ये साक्षात् भगवान श्रीकृष्ण बसले आहेत’, असे मला जाणवले.

२. तीन गुरूंच्या दर्शनाने बराच वेळ भावजागृती होणे

रथ जसजसा जवळ येऊ लागला, तसतसे मला आतूनच आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या. तिन्ही गुरूंच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या) दर्शनाने माझी भावजागृती झाली. मिरवणूक पुढे पुढे गेली, तरी मला भावास्थेत रहाता आले. नंतर मला सेवेला जायला सांगितले, तरी बघितलेल्या दृश्याच्या स्मरणाने माझा भाव जागृत होत होता. पुन्हा मिरवणुकीचे आगमन झाले, तरीही तशीच अवस्था होती. यापूर्वी परात्पर गुरु डॉक्टरांच्या भेटीच्या वेळी किंवा सेवा करतांना त्यांची भेट व्हायची, तेव्हाही भावजागृती होत असे किंवा काही प्रसंगांची आठवण झाली, तरी ही भावजागृती व्हायची; पण ती पुष्कळ वेळ टिकत नसे. या जन्मोत्सव सोहळ्याची मला आठवण झाली, तरी भावजागृती होते.

३. तिन्ही गुरूंची दृष्टी सर्वत्र फिरत होती, तरी प्रत्येकाला वाटत होते की, ते माझ्याकडे बघत आहेत.

परब्रह्म परात्पर गुरु डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति अंजली मुकुल गाडगीळ या तिन्ही गुरूंनी भावजागृती करून घेतली, त्यासाठी त्यांच्या चरणी कोटीशः नमस्कार !’

– श्री. सीताराम (नाना) आग्रे (वय ६७ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा (२४.५.२०२२)

या लेखात/ कवितेत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या/संतांच्या/सद् गुरुंच्या  वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक