सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाचे संगणकीय प्रक्षेपण पहातांना फरिदाबाद येथील साधकांना आलेल्या अनुभूती

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

१. सौ. सावित्री गर्ग (वय ६८ वर्षे),

१ अ. ब्रह्मोत्सव पाहिल्यानंतर आनंद आणि ऊर्जा मिळणे : ‘माझे शारीरिक स्वास्थ्य नेहमी ठीक नसते. मला घरी देवपूजेसाठी बसल्यानंतर उठून उभे रहायला पुष्कळ त्रास होतो; मात्र ब्रह्मोत्सव पाहिल्यानंतर मला एवढा आनंद आणि ऊर्जा मिळाली की, ब्रह्मोत्सव संपल्यानंतर मी त्वरित उठून उभी राहिले आणि चालू शकले. तेथून आल्यानंतर मला थोडाही थकवा आला नव्हता. त्यानंतर गुरुदेवांच्या कृपेने मी व्यष्टी आणि समष्टी साधना करू शकले.’

२. सौ. वंदना सचदेवा

अ. ‘ब्रह्मोत्सवात परात्पर गुरु डॉक्टर विराजमान असलेल्या रथाच्या मागे-पुढे साधक आनंदाने चालत होते. तेव्हा ‘त्या साधकांमध्ये मी आहे’, असे मला वाटत होते.

आ. गुरुदेवांनी त्यांच्या उत्तराधिकारी पदाचे लिहिलेले पत्र ६७ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. विनायक शानभाग वाचून दाखवत होते. तेव्हा गुरुदेवांनी आम्हा सर्व साधकांना ‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या हाती सोपवले आहे आणि सर्व साधक श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या जवळ बसले आहेत’, असे दृश्य मला दिसत होते. त्या क्षणी माझा शरणागतभाव जागृत झाला.

गुरुदेवांनी दिलेल्या या आनंदाच्या क्षणांसाठी मी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’

३. सौ. तृप्ती जोशी

अ. ‘ब्रह्मोत्सव पहातांना ‘माझे डोळे आपोआप बंद होत आहेत आणि ती ध्यानावस्था आहे’, असे मला जाणवत होते.

आ. ‘मी नमस्काराच्या मुद्रेत बसले असून माझ्या शरिरात पिवळ्या रंगाचे चैतन्य जात आहे’, असे मला जाणवले.

इ. मला माझ्या आज्ञाचक्रावर संवेदना जाणवत होत्या. त्या वेळी माझ्या उजव्या हाताच्या अंगठ्यावर लाल रंगाचा दैवी कण दिसून आला.

प.पू. गुरुदेवांच्या कृपेने मी या ब्रह्मोत्सवाचा आनंद घेऊ शकले. त्याबद्दल मी त्यांच्या श्रीचरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’

४. सौ. उषा रखेजा (आध्यात्मिक पातळी,६३ टक्के, वय ७२ वर्षे)

अ. ‘ब्रह्मोत्सव चालू झाल्यावर माझे दोन्ही हात आपोआप जोडले गेले आणि माझा नामजप चालू झाला. माझ्या डोळ्यांतून भावाश्रू येऊ लागले.

आ. साधक गुरुदेवांचा रथ ओढत होते. साधिका नृत्यसेवा करत होत्या, तर काही जण हातात ध्वज घेऊन चालत होते. त्या वेळी जणू ‘हिंदु राष्ट्र आले आहे’, असे मला वाटले.

इ. साधिका डोक्यावर कलश घेऊन चालत होत्या. त्या वेळी मला जलदेवतेप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटली.

ई. व्यासपिठावर आमंत्रित केलेल्या संतांना पाहून आणि त्यांच्याविषयी माहिती ऐकून मला पुष्कळ कृतज्ञता वाटली. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना पाहिल्यावर ‘तेथे तेजस्वी देवता प्रत्यक्ष उभी आहे’, असे मला वाटले.

उ. संपूर्ण ब्रह्मोत्सवात मला आनंदाचीच अनुभूती येत होती.’

(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक : २७.५.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक