इस्लामी आक्रमकांनी मंदिरांवर आक्रमणे करणे चालूच ठेवले आहे. पूर्वांचलातील अनेक राज्ये अहिंदूंनी संख्याबळाने जिंकली आहेत. काश्मीर तर मुसलमानांचा बनला आहे. वर्ष १९४७ मध्ये हिंदुस्थानच्या फाळणीच्या वेळी भारतात अडीच कोटी असलेले मुसलमान आज २५ कोटींहून अधिक झाले आहेत; याच तुलनेत हिंदूंची संख्या १० पटही वाढलेली नाही. हज यात्रेत मुसलमानांवर कोट्यवधी रुपये भारत सरकार खर्च करत आहे आणि हज हाऊसला लाखो रुपये देत आहे. काँग्रेसने मुसलमानांसाठीच खास अल्पसंख्यांक खाते निर्माण केले आहे आणि त्यावर मुसलमान मंत्री नेमला जातो.

गावोगावी शेकडो मोठमोठ्या मशिदी अनधिकृतपणे बांधल्या जात आहेत. काही वर्षांपूर्वी एका मुसलमान गुन्हेगार तरुणीसाठी ‘मुंब्रा बंद’ आणि लाखोंची मिरवणूक निघाली. जाहिरा या बडोद्याच्या मुसलमान तरुणीने वारंवार न्यायालयातील साक्ष पालटून हिंदूंवर दोषारोप केले. आज मदरशांना साहाय्य देण्याच्या योजना चालूच आहेत.
भारताचार्य सु.ग. शेवडे यांचा परिचय

जगप्रसिद्ध प्रवचनकार भारताचार्य सु.ग. शेवडे (वय ८९ वर्षे) यांनी वर्ष १९७६ मध्ये इंदूरचे थोर संत नाना महाराज तराणेकर यांचा अनुग्रह घेतला. त्यांच्या आज्ञेने श्री. शेवडे यांनी शाळेतील मुख्याध्यापकपदाच्या नोकरीचे त्यागपत्र देऊन धर्मप्रसाराच्या कार्यास वाहून घेतले. त्यांनी जगभरात १३ सहस्र ५०० हून अधिक प्रवचने घेतली आहेत. त्यांनी अमेरिकेत ५५० प्रवचने घेतली आहेत. वर्ष २०१६- १७ मध्ये इंग्लंडच्या ‘हाऊस ऑफ कॉमन्स’मध्ये, म्हणजे तेथील संसदेला त्यांनी संबोधित करतांना छत्रपती शिवाजी महाराजांची माहिती दिली. छत्रपती संभाजी महाराजांविषयी गेली अनेक दशके होणारा अपप्रचार श्री. सु.ग. शेवडे यांनी त्यांच्या ‘संभाजी’ या पुस्तकातून पुराव्यांनिशी खोडून काढला. यामुळे पुढे छत्रपती संभाजी महाराजांचा होणारा अपप्रचार थांबला. सनातन संस्थेचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांच्याशीही त्यांची ओळख होती. त्यांनी अनेक वेळा प.पू. भक्तराज महाराज यांच्या भजनांच्या कार्यक्रमाचा लाभ घेतला आहे. प्रसिद्ध हिंदुत्वनिष्ठ लेखक आणि व्याख्याते डॉ. सच्चिदानंद शेवडे हे भारताचार्य सु.ग. शेवडे यांचे पुत्र, तर आयुर्वेदाचार्य वैद्य परीक्षित शेवडे हे नातू आहेत.
डेन्मार्कमध्ये महंमद पैगंबराचे व्यंगचित्र काढल्याच्या कारणावरून लाखो मुसलमानांनी हिंदुस्थानात गावोगावी निदर्शने केली आणि प्रचंड मालमत्तेची हानी केली. हिंदुद्वेष्टे एम्.एफ्. हुसेनने भारतमाता, श्रीराम-सीता-हनुमान इत्यादींची नग्न चित्रे काढून हिंदूंच्या देवतांची विटंबना केली. त्याचा धिक्कार करण्यापलीकडे आम्ही काहीच करू शकलो नाही.

अंधश्रद्धा निर्मूलनाच्या नावाखाली हिंदु धर्माच्या विविध आचार – विचारांवर बंदी आणण्याचे कारस्थान अंनिस आणि प्रा. शाम मानव आदी करत आहेत. ज्या मनुस्मृतीला ब्रिटीश काळात ‘हिंदु लॉ’सारखे मानले जात होते, ज्या मनूला जगातील पहिला ‘समाजशास्त्रज्ञ’ म्हणून ओळखले जाते, त्याच्या ग्रंथातील काही विचार काहींना पटत नाहीत, म्हणून सहस्रो वर्षापूर्वींच्या ग्रंथावर बंदी आणण्याचा विचार काँग्रेस शासन काळात करण्यात आला.

ही बंदी आणल्याने हिंदु धर्माचे काहीच बिघडत नाही; पण हिंदूंच्या मस्तकावर प्रहार करण्याचा आनंद काही मस्तवाल लोकांना होईलच ! अशी बंदी कुराणावर आणण्यास सरकार धजावेल का ? हे सगळे काय चालले आहे ? या काँग्रेसवाल्यांनी १९४७ मध्ये मुसलमानांना देशाचा एक तुकडा देऊन टाकला; पण हिंदुस्थानातील मुसलमानांना तेथून घालवले नाही. पाकिस्तान मुसलमानांचा आणि हा हिंदुस्थान मात्र सर्व धर्मियांचा ? हिंदुस्थान शब्दातीलसुद्धा ‘हिंदु’ हा शब्द काढून टाकण्यासाठी या देशाला भारत बनवले.
परमेश्वरा, तूच हिंदूंचे रक्षण कर !!
– भारताचार्य सु.ग. शेवडे
Karnataka Minister Priyank Kharge : (म्हणे) ‘जगभरातील तंत्रज्ञान क्षेत्र वेगाने पुढे जात असतांना सरकार ‘आयआयटी’ संस्थांना ज्योतिष, पुनर्जन्म आदींचे संशोधन करण्यास जुंपत आहे !’
गोपालगंज जिल्ह्यातील एकाच हिंदु कुटुंबातील ४ जणांवर आक्रमण
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात पीडित धर्मांध मुलांना प्रत्येकी १० लाख रुपये हानीभरपाई देण्याचा मद्रास उच्च न्यायालयाचा आदेश !
‘श्री समर्थ रामदास – एक अभ्यास’ ग्रंथ : अभ्यासपूर्ण मननीय, चिंतनीय आणि संदर्भ ग्रंथ
सिनेमा आणि स्वतःची स्वप्ने : यशाविषयी सिनेमा काय प्रकट करतो ?
श्री शिवराज्याभिषेक आणि खोटे कथानक (नॅरेटिव्ह) !