देवा, लाभो तुझा सहवास प्रत्येक क्षणी ।

‘पूर्वी एकदा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले सेवेच्या निमित्ताने माझ्याशी बोलले होते. १०.४.२०२३ या दिवशी मी ध्यानमंदिरात नामजपाला बसले असतांना मला तो मागील प्रसंग आठवला आणि मला पुढील ओळी सुचल्या.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

तुझ्या या दिव्य दर्शनाने । मन माझे मोहून गेले ।
गोड तुझे रूप । गोड तुझे हास्य ।। १ ।।

सौ. राधा गावडे

मनाला काही कळेना । मनाला काही सुचेना ।
मन झाले माझे स्तब्ध । मनाला झाले दर्शन आत्मारामाचे ।। २ ।।

चोहीकडे झाली । आनंदाची उधळण ।
कानी पडली । गोड तुझी अमृतवाणी ।। ३ ।।

भान राहिले ना मला माझे । सावरले मी माझे मला ।
असे तुझे रूप डोळ्यांत । माझ्या राहो सदैव ।। ४ ।।

असे तुझे बोल । कानी पडो माझ्या सदैव ।
असे तुझे हास्य । मनाला भावो सदैव ।। ५ ।।

धन्य धन्य झाले मी देवा । किती कृतज्ञता व्यक्त करू ।
कळेना या जिवा । ओढ लागली तुझी ।। ६ ।।

या अज्ञानी तुझ्या लेकराला । लाभो तुझा सहवास प्रत्येक क्षणी ।
हीच मागणी । आता दीनदयाळा ।। ७ ।।

– सौ. राधा घनश्याम गावडे (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१०.४.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक