‘विवाहानंतर मुला-मुलींसाठी परेच्छेने वागणे, हे नित्याचेच होते. हा भाग त्यांच्या आई-वडिलांच्या साधनेसाठी साहाय्यक ठरतो. तसेच पतीही विवाहानंतर पत्नीची काळजी घेणे, पत्नीच्या आवश्यकतांची पूर्तता करणे यांसारख्या कृतींच्या माध्यमातून स्वतःला विसरून इतरांचा विचार करू लागतो. पती पत्नीच्या आवडी-निवडी जपण्यासाठी स्वतःच्या आवडी-निवडींकडे दुर्लक्ष करतो. त्यातून तो परेच्छेने वागण्यास शिकतो. त्यामुळे पतीलाही पत्नी एका अर्थाने साधनेसाठी साहाय्यक ठरते. याचप्रमाणे इतर कुटुंबियांच्या वागण्यामुळे पतीला आणि सर्वच कुटुंबियांना साधनेत लाभ करून घेता येतो.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले