मथुरा – श्रीकृष्णजन्मभूमी आणि शाही ईदगाह वाद प्रकरणी न्यायमूर्ती मयंक कुमार जैन यांच्या न्यायालयात १५ मे या दिवशी सुनावणी झाली. ‘सुन्नी वक्फ बोर्ड’ न्यायालयीन प्रक्रियेत सहकार्य करत नसल्याचे हिंदु पक्षाच्या वतीने न्यायालयात सांगण्यात आले.
The "Sunni Waqf Board" is not cooperating in the judicial proceedings of the #ShriKrishnaJanmabhoomi case ! – Hindu side pic.twitter.com/ZsVsUg9qX6
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 16, 2024
श्रीकृष्णजन्मभूमी ट्रस्ट आणि संस्थानचे अधिवक्ता हरेराम त्रिपाठी आणि अधिवक्ता प्रणय ओझा यांनी संयुक्तपणे ७ मेच्या आदेशाचा संदर्भ देत सांगितले की, न्यायालयाने वारंवार विनंती करूनही ‘सुन्नी वक्फ बोर्डा’कडून आवश्यक प्रतिज्ञापत्र पक्षकारांना उपलब्ध होत नाही. न्यायालयीन प्रक्रियेत जाणीवपूर्वक अडथळा आणला जात आहे.