
हिंदूंनी स्वतःच्या न्याय्य आणि योग्य अधिकाराचे स्वतःच्याच भूमीत संरक्षण करणे, ही जर जातीनिष्ठता असेल, तर आम्ही हिंदू पहिल्या पदवीचे जातीनिष्ठ असून तसे एकनिष्ठ हिंदु जातीय म्हणून म्हणवून घेण्यात आम्ही भूषणच मानू; कारण आमच्या मते अशी जातीनिष्ठता, म्हणजेच खरी आणि न्याय्य अशी राष्ट्रीयता होय. काय वाटेल ते झाले, तरी हिंदूसंघटन या ध्येयाला चिकटून रहा. तेच तुम्हाला तारेल आणि भवितव्याला तोंड देण्यास समर्थ ठेवील. याचे सूत्र हेच की, हिंदूंचे सैनिकीकरण आणि राजनीतीचे हिंदुकरण !
– संकलक : श्री. दुर्गेश परुळकर
सर्वसामान्यांकडून अज्ञानातून होणारा मूर्खपणा !
रणांगण किंवा संघर्ष जिंकणार्यांसाठी गीता !
सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने १५ जुलैला रत्नागिरी येथे विशेष कार्यक्रम
भारतियांचे राष्ट्रीय महापातक !
निष्क्रीयता टाळा !