नागपूर येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्‍या धर्मांधाला अटक !

प्रतिकात्मक चित्र

नागपूर – १६ वर्षीय मुलीवर बलात्कार करणारा आरोपी शेख राशीद शेख आसिफ (वय २० वर्षे) याला जरीपटका पोलिसांनी अटक केली. पीडित तक्रारदार मुलीची तिच्या महाविद्यालयासमोर नेहमी येणार्‍या शेख राशीद शेख आसिफ याच्यासमवेत ओळख झाली. त्याने पीडिता अल्पवयीन असल्याचा लाभ घेत तिला दुचाकीवरून एका मित्राच्या खोलीवर नेले. तिथे तिच्याशी शारीरिक संबंध ठेवत त्याची चित्रफितही काढली.

नंतर व्हिडिओ प्रसारित करण्याची धमकी देऊन आरोपीने पीडित मुलीशी वारंवार शारीरिक संबंध ठेवले. मुलीने तिच्या आईला याविषयी सांगितले. पीडित मुलीच्या आईने आरोपीला समजावले असता त्याने अश्लील शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी मुलीने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंद करून पोलिसांनी शेख याला अटक केली आहे.

संपादकीय भूमिका :

  • दिवसाढवळ्या अल्पवयीन हिंदु मुलींवर बलात्कारकरणार्‍या उद्दाम धर्मांधांना फाशीचीच शिक्षा देणे आवश्यक !
  • लव्ह जिहाद रोखण्यासाठी देश स्तरावर व्यापक कायदा हवा  !
  • अशा धर्मांध वासनांध आरोपींना अरब राष्ट्रात जशी शरियत कायद्यानुसार शिक्षा केली जाते तशी शिक्षा या धर्मांधांना का करू नये ?, असे वाटल्यास चूक ते काय ?
  • नेहमी हिंदूंच्या विरोधात कुरघोडी करणारे साम्यवादी, काँग्रेस, पुरोगामी अशा घटनांविषयी चकार शब्दही काढत नाहीत, हे लक्षात घ्या. अशा घटनांच्या वेळी ते कोणत्या बिळात लपून बसतात ?