पाली (राजस्थान) – येथील आदिवासी पाली उपविभागातील नाना पोलीस ठाण्याच्या परिसरात एका १९ वर्षीय युवतीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. येथील एका मशिदीच्या मौलवीने मुलीला कामाच्या बहाण्याने मशिदीत बोलावले आणि तिच्यावर बलात्कार केला. मुलगी घरी न परतल्याने कुटुंबियांनी शोधाशोध चालू केली. कुटुंबीय मशिदीत पोचले असता त्यांना मौलवी मुलीसह एका बंद खोलीत असल्याचे त्यांन आढळून आले. संतापलेल्या कुटुंबियांनी मौलवीच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर गुन्हा नोंदवण्यात आला.
१९ वर्षीय पीडितेने तक्रारीत म्हटले आहे की, मौलवी अब्दुल गनी हा तिच्या घरी ये-जा करत असे. २ मेच्या दुपारी मौलवी घरी आल्यावर त्याने पीडितेला ३ मेच्या सायंकाळी ‘एक काम आहे’, असे सांगून मशिदीत येण्यास सांगितले. ती मशिदीत गेल्यानंतर मौलवीने तिला एका खोलीत नेले आणि तिच्यावर अत्याचार केले. कुटुंबियांना सांगितल्यास ठार करण्याची धमकीही त्याने दिली.
संपादकीय भूमिकाअशा वासनांधांना शरीयत कायद्यानुसार मृत्यूदंडाची शिक्षा देण्याची कुणी केल्यास आश्चर्य वाटू नये ! |

मद्यधुंद अवस्थेत भरधाव वेगाने वाहन चालवणार्या २ जणांवर गुन्हा नोंद
माहीम येथेही रेल्वेस्थानकाबाहेर चाकूने आक्रमण !
६० वर्षांच्या अबरार याने ४ वर्षांच्या मुलीचे अपहरण करून केला बलात्कार
Ayodhya RamMandir Theft Row : श्रीराममंदिरातील दान चोरीतील ५ आरोपींची घरे जवळजवळ असल्याचे उघड
आसामच्या माजी पोलीस उपमहानिरीक्षकांची ५३ कोटी रुपयांची संपत्ती जप्त !
Kailash Vijayvargiya On RSS : रा.स्व. संघात गर्दी वाढल्याने चांगल्या लोकांची कमतरता !