स्थानिकांच्या साहाय्याने वणवा आटोक्यात !
पुणे – कात्रज जुन्या घाटात खेड-शिवापूरकडून कात्रजच्या दिशेने येतांना डाव्या बाजूला जुन्या बोगद्याजवळ पांढरा कडा येथे २८ एप्रिल या दिवशी आग (वणवा) लागली. व्यसनी, मद्यपी यांनी आग लावल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी वन विभागाच्या कर्मचार्यांनी स्थानिकांच्या साहाय्याने २ घंट्यांच्या प्रयत्नांनी आग आटोक्यात आणली. वणव्यांच्या घटनांमुळे वनसंपत्ती, तसेच वन्यजीव यांची मोठी हानी होते. प्रतिवर्षी उन्हाळ्यामध्ये कात्रज घाटात वणवा लागण्याच्या घटना वारंवार घडत असून वन विभागाकडून त्या रोखण्यासाठी कोणताही ठोस उपाय केला जात नाही. घाटांमध्ये फिरायला येणार्या नागरिकांवर पोलिसांनी कठोर कारवाई करावी, अशी पर्यावरणप्रेमींकडून मागणी केली जात आहे.