इस्लाममध्ये ‘हलाल’ आणि ‘हराम’ हे मूळ अरबी भाषेतील शब्द प्रसिद्ध आहेत. ‘हलाल’ शब्दाचा अर्थ आहे, इस्लामनुसार वैध, संमत, मान्यता असलेले; तर त्याच्या विरुद्धार्थी शब्द आहे, ‘हराम’ अर्थात् इस्लामनुसार अवैध, निषिद्ध किंवा वर्जित असलेले. इस्लाममध्ये ‘हलाल’ हा शब्द प्रामुख्याने खाद्यान्न आणि द्रवपदार्थ यांच्या संदर्भात वापरला जातो.