Gyanvapi Case : ज्ञानवापीमध्ये सर्वेक्षणाचा निर्णय देणार्‍या न्यायमूर्तींना पुन्हा धमक्या !

  • न्यायाधिशांच्य सुरक्षेत वाढ !

  • न्यायाधिशांना विदेशातून धमकीचे दूरध्वनी येणे, हे प्रशासनाला लज्जास्पद !

न्यायाधीश रवि कुमार दिवाकर

वाराणसी – ज्ञानवापीमध्ये सर्वेक्षणाचा निर्णय घोषित करणारे न्यायाधीश रवि कुमार दिवाकर यांना विदेशातून धमकीचे दूरध्वनी येत आहेत. न्यायाधिशांनी सांगितले की, गेल्या २० ते २४  दिवसांत त्यांना १४० ‘कोड नंबर’वरून अनेक वेळा धमकीचे दूरध्वनी आले आहेत. न्यायाधिशांनी वरिष्ठ पोलीस अधीक्षकांना पत्र लिहून यासंदर्भात तक्रार केली आहे. या प्रकरणाचे ‘सायबर सेल’कडून अन्वेषण करण्यात येत आहे. ‘यामध्ये जे काही तथ्य समोर येईल त्याआधारे पुढील कारवाई केली जाईल’, असे वरिष्ठ पोलीस अधीक्षक सुशील घुले यांनी सांगितले.

१. ज्ञानवापी खटल्याचा निकाल दिल्यानंतर प्रसिद्धीझोतात आलेले रवि कुमार दिवाकर सध्या बरेली येथील ‘फास्ट ट्रॅक कोर्ट २’ मध्ये न्यायाधीश आहेत.

२. काही काळापूर्वी त्यांनी मौलाना तौकीर रझा यास वर्ष २०१० मधील दंगलीच्या प्रकरणी मुख्य आरोपी घोषित केले होते. या कालावधीत न्यायाधीश रवि कुमार दिवाकर यांना परदेशातून दूरध्वनीवरून धमकावणे चालू झाले होते.

३. या धमकीनंतर प्रशासनाने न्यायाधिशांची सुरक्षा अधिक कडक केली आहे.