बेंगळुरू (कर्नाटक) येथे ‘जय श्रीराम’ऐवजी ‘अल्लाहू अकबर’ म्हणण्यासाठी मुसलमान तरुणांची धमकी !

(‘अल्लाहू अकबर’ म्हणजे ‘अल्ला महान आहे’.)

मुस्लिम युवक हिंदू सोबत वाद घालत असताना

बेंगळुरू (कर्नाटक) – राज्यातील चिक्कबेट्टहळ्ळी येथे रामनवमीच्या दिवशी काही हिंदू त्यांच्या चारचाकी वाहनातू बसून ‘जय श्रीराम’ अशी घोषणा देत होते. त्या वेळी दुचाकीवरून आलेल्या मुसलमान तरुणांनी या चारचाकीला अडवून ‘येथे जय श्रीराम म्हणायचे नाही, तर केवळ  ‘अल्लाहू अकबर’ म्हणायचे’, अशी धमकी दिली. तसेच शिवीगाळ केली. त्या वेळी दोघांमध्ये बाचाबाची झाली. मुसलमानांनी केलेल्या आक्रमणात एक हिंदु तरुण घायाळ झाला. या प्रकरणी पोलिसांत तक्रार करण्यात आली आल्यानंतर ३ मुसलमान तरुणांना अटक करण्यात आली आहे, तर अन्य दोघांचा शोध घेतला जात आहे.

१. हिंदु तरुणांना ‘जय श्रीराम’ न म्हणण्यास सांगण्यात आल्यावर हिंदु तरुण मुसलमान तरुणांना म्हणाले की, ‘आमचा सण आहे आम्ही काय पाहिजे ते करू. तुमच्या सणांच्या आम्ही असे काही करतो का ?’ असा प्रश्‍न विचारला.

२. त्यावर या मुसलमान तरुणांनी हिंदु तरुणांवर आक्रमण करण्याचा प्रयत्न केल्यावर हिंदु तरुणांनीही त्यांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. यानंतर मुसलमान तरुणांनी त्यांना मारहाण केली आणि पळून गेले.

संपादकीय भूमिका 

कर्नाटकमध्ये काँग्रेसचे सरकार असल्याने धर्मांध मुसलमान उद्दाम झाले आहेत, हे आतापर्यंत अनेक घटनांतून समोर आलेच आहे. ही स्थिती काँग्रेस सत्तेत असेपर्यंत हिंदूंना भोगावी लागणार आहे, हेही तितकेच खरे !