मुसलमानांसाठी व्याजमुक्त ‘हलाल तारण योजना’ आणण्याचा कॅनडा सरकारचा विचार !

खलिस्तानी आतंकवाद्यांनंतर आता मुसलमानांचे लांगूलचालन करण्याचा जस्टिन ट्रुडो यांचा प्रयत्न !

ओटावा (कॅनडा) – कॅनडात स्वत:ची लोकप्रियता अल्प होत असल्यामुळे धास्तावलेले पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी खलिस्तानी आतंकवाद्यांनंतर आता मुसलमानांच्या लांगूलचालनास आरंभ केला आहे. सरकारने म्हटले आहे की, मुसलमान समुदायाला आर्थिक साहाय्य करण्यासाठी ‘हलाल तारण योजना’ चालू करण्याचा विचार केला जात आहे.

काही खासगी बँकांमध्ये ही योजना आधीपासूनच चालू करण्यात आली असली, तरी आता सार्वजनिक बँकांमध्येही ही योजना चालू करण्यात येणार आहे.

सौजन्य Oneindia News

१. ट्रुडो सरकारला कॅनडातील लोकांना घरे उपलब्ध करून देण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे सरकारने देशात घरे खरेदी करणार्‍या परदेशी लोकांवर २ वर्षांची बंदी घातली आहे. सध्या ‘हलाल तारण योजना’ आणल्यास देशाच्या अर्थकारणावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो.

२. सरकारने १६ एप्रिल या दिवशी २०२४-२५ या आर्थिक वर्षाचा फेडरल अर्थसंकल्प सादर केला. त्यात ही योजना आणण्याचा विचार केला जात असल्याचे सरकारने म्हटले आहे.

हलाल तारण योजना काय आहे ?

हलाल तारण योजना इस्लामच्या शरीयत कायद्याचे पालन करते. इस्लाम व्याज घेण्यास प्रतिबंधित करतो; कारण ते हराम (इस्लामध्ये प्रतिबंधित) मानले जाते. इस्लामी नियमांचे पालन करणार्‍या बँका किंवा वित्तीय संस्था विशेष तारण उत्पादने देतात. यात व्याज देणे टाळले जाते. दुसरीकडे असे तारण देणे पूर्णपणे व्याजमुक्त असू शकत नाही, असे तज्ञांचे मत आहे. तथापि यात व्याजाऐवजी नियमित शुल्काचा समावेश असू शकतो.

संपादकीय भूमिका 

‘विनाशकाले विपरीत बुद्धी’चे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे कॅनडाचे पंतप्रधान ! त्यांच्या या आत्मघातकी धोरणामुळे उद्या कॅनडा इस्लामी राष्ट्र झाले, तर आश्‍चर्य वाटू नये !