नावाप्रमाणे सतत आनंदी असणारी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील सौ.आनंदी अतुल बधाले !

चैत्र शुक्ल सप्तमी (१५.४.२०२४) या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात राहून साधना करणारी सौ. आनंदी बधाले हिचा २६ वा वाढदिवस आहे. तिच्या कुटुंबियांना तिच्याविषयी जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

सौ. आनंदी बधाले यांना २६ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !

सौ. आनंदी बधाले

१. श्रीमती संध्या बधाले (सौ. आनंदीच्या सासूबाई), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

१ अ. ‘एकदा आम्हाला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा सत्संग मिळाला होता. तेव्हा ते आनंदीला म्हणाले, ‘तू नावाप्रमाणेच आनंदी आहेस.’

१ आ. परिस्थितीशी जुळवून घेणे : सौ. आनंदीला काही गोष्टी न सांगताही समजतात. त्यामुळे ‘कोणत्या परिस्थितीत कसे वागावे ?’, हे तिला समजते. ती सर्व परिस्थितीशी जुळवून घेते.

१ इ. नेहमी उत्साही असणे : ती दैनिक ‘सनातन प्रभात’शी संबंधित सेवा करते. कधी सेवा अधिक असल्यास तिला रात्री निवासस्थानी जाण्यास उशीर होतो आणि अन्य आश्रमसेवाही असतात, तरी ‘तिच्या चेहर्‍यावर ती दमली आहे’, असे कधी दिसत नाही. पुन्हा दुसर्‍या दिवशी ती तितक्याच उत्साहात सेवेला आलेली दिसते. तिच्या आईची प्रकृती बरी नसल्याने तिला त्यांनाही साहाय्य करावे लागते; पण त्याविषयी तिची कोणतीही तक्रार नसते.

१ ई. सेवेची तळमळ : एकदा आम्हाला बाहेर जायचे होते; पण तिला तातडीची सेवा असल्यामुळे तिला येणे शक्य नव्हते. तेव्हा तिने त्या वेळी भावनिक स्तरावर विचार न करता सेवेला प्राधान्य दिले.

१ उ. सर्वांशी मिळून-मिसळून रहाणे : माझा मोठा मुलगा अमोल याच्या विवाहानिमित्त माझे सर्व नातेवाईक रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात आले होते. तेव्हा ती सर्वांशी मिळून मिसळून रहात होती. आम्ही कधी गावाला गेलो, तरी ती सर्वांशी सहजतेने आणि आपलेपणाने वागते. तिथे कोणतीही कामे करतांना ती सहजतेने करते. तसेच ती मोठ्यांशी मोठ्यांप्रमाणे, तर लहानांशी लहानांप्रमाणे आणि प्रेमाने वागते. त्यामुळे माझ्या नातेवाइकांनी कधी भ्रमणभाष केला, तर ते आवर्जून आनंदीची विचारपूस करतात.

१ ऊ. साधनेविषयी योग्य दृष्टीकोन देणे : मला सौ. आनंदीशी साधनेविषयी मनमोकळेपणाने बोलता येते. त्या वेळी ती मला साधनेविषयी योग्य दृष्टीकोन देऊन सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावर श्रद्धा ठेवून प्रयत्न करण्यास सांगते.

१ ए. ‘ती माझी सून नसून माझी मुलगीच आहे’, असे मला वाटते.

सौ. आनंदीचे गुण देवाने माझ्या लक्षात आणून दिले’, त्याबद्दल श्री गुरुचरणी कृतज्ञता व्यक्त करते.’

२. श्री. अमोल बधाले (दीर) सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

२ अ. ‘सौ. आनंदीचे मन निर्मळ आहे.

२ आ. तिच्यात प्रेमभाव असल्याने तिच्याशी सहज आणि मनमोकळेपणाने बोलता येते.

२ इ. नावाप्रमाणे आनंदी असणे : ‘तिने सेवा किंवा अन्य कोणत्याही गोष्टीचा ताण घेतला आहे’, असे तिच्या चेहर्‍यावरून कधीच जाणवत नाही. त्यामुळे ती नावाप्रमाणे नेहमी आनंदी असते.’

(सर्व सूत्रांचा दिनांक २३.३.२०२४)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक