१. ‘अत्यंत सुखदायक, ज्या उद्देशाने मी संपूर्ण भारतभ्रमण केले, तो उद्देश या सनातनच्या आश्रमात आल्यावर पूर्ण झाला.’
– श्री. आचार्य राजेश्वर (राष्ट्रीय अध्यक्ष, संयुक्त भारतीय धर्म संसद) जयपूर, राजस्थान.
२. भारत देशासह जगातील प्रत्येक नागरिकाला येथे घेऊन येण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. लोकांना प्रार्थना आहे की, आश्रमात आपल्या क्षमतेनुसार तन-मन-धनाने सहभाग घ्यावा. हिंदु राष्ट्राच्या संकल्पनेला साकार करावे.’ आपले कुटुंब आणि विशेषतः मुलांना येथे अवश्य आणले पाहिजे. त्यामुळे घरासह आपल्या आसपासच्या लोकांमध्ये सकारात्मक विचारांचा प्रसार होऊ शकेल.
– श्री. विशाल ताम्रकार (राष्ट्रीय परामर्शदाता, लक्ष्य सनातन संगम) दुर्ग, छत्तीसगड.
३. आश्रम पाहून पुष्कळ चांगले आणि सकारात्मक वाटले. माझे मन शांत झाले. येथे ईश्वरी चैतन्य जाणवते. आश्रमात व्यवस्थितपणा आणि स्वच्छता आहे. प्रत्येक ठिकाणी आवश्यकतेनुसारच साहित्य ठेवले आहे. आश्रम अत्युत्तम आहे.’
– श्री. दिनेश राठौड (स्वयंसेवक, हिन्दू जागरण मंच) पाली, राजस्थान.
४. आश्रमातील व्यवस्था सकारात्मक आणि प्रेरणादायक आहे. त्यामुळे स्वतःचे विचार सकारात्मक होऊन ऊर्जा मिळते.’
– आचार्य चंद्र किशोर पाराशर (संस्थापक, आंतरराष्ट्रीय सनातन हिन्दू वाहिनी) मुजफ्फरपूर, बिहार.
‘संशोधन’ आणि ‘संगीत’ या विषयांवरील PPT (Power Point Presentation (टीप) पाहून दिलेले अभिप्राय
टीप – हे एक सॉफ्टवेअर (संगणकीय प्रणाली) असून यावर संबंधित विषयांची विविध वैशिष्ट्ये दाखवता येतात.
१. ‘संगीताचे संशोधन आश्चर्यजनक आहे. मी यापूर्वी कधीच असा विचार केला नव्हता. हे जाणून मला अत्यंत प्रसन्नता वाटली.
२. संगीत आणि सूक्ष्म जगताचे प्रदर्शन यांचा संपूर्ण देशात प्रचार झाला पाहिजे.
३. आमची युवा पिढी संभ्रमित, संस्कारहीन आणि अज्ञानी झाली आहे. त्यामुळे युवा पिढीपर्यंत अधिकाधिक हे कसे पोचेल, यावर आपण सर्वांनी चिंतन करावे.’
– श्रीमती सुमन अग्रवाल, देहली
४. नाद ब्रह्माविना जीवन व्यर्थ आहे. संगीत विषयाची अधिकाधिक लोकांमध्ये जागृती करण्याचा हेतू आणि प्रयत्न चांगला आहे.’
– श्री. आचार्य राजेश्वर
५. ‘सर्वांत चांगले वाटले. संगीत उपचार (थेरेपी) विषयी जाणून घेतले. ‘मनाची शांती आणि कार्यक्षेत्र यासाठी अधिक ऊर्जेने कार्य करावे’, अशी मला प्रेरणा मिळाली.’
– श्री. गौतम चंद राठौड
६. ‘संगीत म्हणजे वास्तविक जीवनात एक ईश्वरी दर्शन असते, जसे संगीतामध्ये सृष्टीचेच स्वरूप सामावले आहे.’
– श्री. दिनेश राठौड
७. ‘संगीतातील संशोधन ही एक सत्य माहिती आहे, ज्यामुळे जगातील लोकांनाही आपण भारत देशाच्या वास्तविकतेशी जोडून सर्वांचे कल्याण करू शकतो.’ – श्री. विशाल ताम्रकार (राष्ट्रीय परामर्शदाता, लक्ष्य सनातन संगम) दुर्ग, छत्तीसगड.
(सर्व सूत्रांचा दिनांक १७.६.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार मान्यवरांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |