धर्माचरण करण्याचे लाभ !

साधना सत्संगातील जिज्ञासू महिलेने कपाळावर कुंकू लावल्यावर तिच्या व्याधी दूर होणे आणि तिला सकारात्मक ऊर्जा मिळून आनंद मिळणे

सौ. नीता के.यू

‘२५.१२.२०२३ या दिवशी मी कोची, केरळ येथील सेवाकेंद्रात गेले होते. तेथून घरी आल्यावर मला कपाळावर कुंकू लावण्याची तीव्र इच्छा झाली. त्यानंतर मी नियमित कुंकू लावण्यास आरंभ केला. मी पूर्वी विविध व्याधींनी त्रस्त होते आणि सतत औषधे घेत होते. माझ्यावर औषधोपचारांचा परिणाम होत नव्हता. मी एक आठवडा नियमित कुंकू लावल्यावर माझ्या सर्व व्याधी दूर झाल्या. मला सकारात्मक ऊर्जा मिळून सतत आनंद मिळत आहे. ही अनुभूती दिल्याबद्दल मी भगवान श्रीकृष्ण आणि गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. आठवले) यांची मनापासून कृतज्ञता व्यक्त करते.’ (‘हिंदु धर्मातील प्रत्येक कृती कशी शास्त्रावर आधारित आहे आणि धर्माचरण केल्याने किती लाभ होतो !’, हेच यातून सिद्ध होते.’ – संकलक)

– सौ. नीता के.यू., केरळ (२०.०२.२०२४)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक