विशेष संपादकीय : नववर्षाचा नुसता संकल्प नको, कृती हवी !

आज गुढीपाडवा ! गुढीपाडवा म्हणजे हिंदूंच्या नववर्षाच्या आरंभाचा दिवस ! पाडव्याला वर्षारंभीच सर्वांचे आशीर्वाद घ्यायचे आणि आपली कर्तव्ये करण्यास प्रारंभ करायचा असतो. यात अनेक गोष्टी येतात. गुढीपाडवा हा ऋतूंवरून प्रचारात आलेला आपला सण आहे. त्याचसमवेत त्याला धार्मिक अधिष्ठानासमवेत पर्यावरणाचा संदर्भही आहे. अनेक संकल्प करण्याचा हा दिवस आहे. प्राचीन धार्मिक परंपरेनुसार ब्रह्मदेवांनी याच तिथीला सृष्टीची निर्मिती केली होती. त्यामुळेच या तिथीला ‘युगादी’ असेही म्हणतात. पुढे त्रेतायुगामध्ये प्रभु श्रीरामचंद्राने तामसी रावणाचा वध केल्यावर वनवास संपवून अयोध्येमध्ये प्रवेश केला तोही चैत्र शुक्ल प्रतिपदेला. त्या मंगलमय दिवशी समस्त अयोध्यावासियांनी गुढ्या उभारून प्रभु श्रीरामचंद्राचे स्वागत केले. प्रभु श्रीरामचंद्राशी संबंधित आणखी एक संदर्भ म्हणजे रामनवमीचे नवरात्र याच तिथीला चालू होते. सम्राट विक्रमादित्याने विक्रम संवत् याच तिथीला चालू केला, तसेच सम्राट शालिवाहनाने चालू केलेल्या शालिवाहन शकाचा आरंभही याच तिथीला होतो. साडेतीन शुभमुहूर्तांपैकी गुढीपाडवा हा एक शुभमुहूर्त आहे. अशा अनेक मंगलमय क्षणांची साक्षीदार असलेली ही तिथी म्हणजे भारतीय संस्कृतीची विजय पताकाच आहे.

अधर्माची अवधी तोडीं। दोषांचीं लिहिलीं फाडीं।
सज्जनांकरवीं गुढी। सुखाची उभवीं ॥ (ज्ञानेश्वरी ४.५२)

अर्थ : संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ‘भगवंत अवतार धारण करतात, तेव्हा ते समाजातील नकारात्मक प्रवृत्तींचा नाश करून नाना प्रकारच्या दोषांचे निराकरण करून सज्जनांच्या (साधकांच्या) माध्यमातून प्रत्येकाच्या जीवनामध्ये सुखाची गुढी उभारतात.’

गुढी म्हणजे विजयपताका आहे. विजयी विरांचे स्वागत गुढ्या उभारून करतात. उजेडाचा अंधारावर विजय, चांगल्याचा वाईटावर विजय, धर्माचा अधर्मावर विजय असा संदेश देणारी ही गुढी असते. आज आपल्या घरावर दिमाखाने उभारलेल्या गुढीकडे पाहून मनात कोणते विचार येतात ? ‘मी व्यक्ती आणि समाज म्हणून कशावर विजय मिळवू इच्छितो ? कोणत्या नकारात्मक प्रवृत्तींचे निर्दालन करण्याचे माझे दायित्व आहे ?’, यावर प्रत्येकाने चिंतन आणि कृती करणे आवश्यक आहे.

आज आपल्या आजूबाजूला प्रत्येक क्षणी नवनवीन आव्हाने उभी रहात आहेत. आरोग्यापासून ते शिक्षणापर्यंत आणि सीमांच्या सुरक्षेपासून ते पर्यावरणापर्यंत सर्वच क्षेत्रांत मोठे पालट होत आहेत. समाजातील सज्जनांनी सक्रीय होऊन या पालटांना सामोरे गेले पाहिजे. सज्जनशक्तीच्या बळावर या पालटांना एक विधायक वळण दिले पाहिजे. हिंदूंमध्ये या नववर्षाच्या निमित्ताने जागृती करण्याचा प्रयत्नही हिंदु संघटनांकडून मोठ्या प्रमाणात होत आहे. त्याला यशही येत आहे. केंद्रातील काँग्रेसचे सरकार गेल्यापासून देशातही काही प्रमाणात हिंदुत्वाला ऊर्जितावस्था आली आहे; मात्र जगात अजूनही हिंदूंवर अत्याचार होत आहेत. त्यामुळे ही ऊर्जितावस्था अजूनही अपूर्ण स्थितीत आहे. ती पूर्ण स्थितीत येण्यासाठी हिंदूंना पुष्कळ कष्ट घ्यावे लागतील. उत्तरप्रदेशात योगी आदित्यनाथ यांनी हिंदूंच्या जुन्या जखमा मिटवण्याचा प्रयत्न केला. तसे देशातील सर्व राज्यांत होणे अपेक्षित आहे. श्रीरामजन्मभूमीचा निकाल हिंदूंच्या बाजूने लागल्यानंतर भव्य श्रीराममंदिरही बांधण्यात आले आहे. श्रीरामामुळे अयोध्येत ‘सूक्ष्मरूपा’ने रामराज्य आले आहे.

संकल्प पूर्ततेसाठी प्रयत्न आवश्यक !

आतंकवाद, नक्षलवाद, धर्मांध आणि समाजकंटक यांच्यामुळे आजचा समाज भयग्रस्त झाला आहे. आता ‘देशात रामराज्य निर्माण करायचे आहे’, अशी स्थिती निर्माण करण्यासाठी संकल्प करण्याची नितांत आवश्यकता आहे. संकल्प केल्याविना किंवा एक ध्येय ठेवल्याविना कुठल्याही कार्याला दिशा रहात नसते. असे असले, तरी नुसता संकल्प करून चालणार नाही, तर हा संकल्प पूर्ण होण्यासाठी हिंदूंना कृतीच्या दिशेने प्रयत्न करावे लागतील. त्यामुळे ईश्वराने सज्जनांना जे कौशल्य दिले आहे, त्यानुसार प्रत्येकाने त्या कौशल्याचा वापर करून रामराज्याचा कार्यात हातभार लावला पाहिजे. अनेक संत-महात्मे आणि द्रष्टे यांनी सांगितल्यानुसार वर्ष २०२५ मध्ये भारतात हिंदु राष्ट्र येणारच असले, तरी त्यासाठी कृती करणे आवश्यक आहे.

संघटित होण्याचा संकल्प करूया !

समाजात लव्ह जिहाद, भूमी जिहाद, हलाल प्रमाणपत्राद्वारे अर्थव्यवस्थेवर होणारे आघात, धर्मांतर या समाजघातक गोष्टी करण्यासाठी धर्मांधांना मशिदी आणि मदरसा यांतून प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे बारकाईने पाहिल्यास समाजात वरील सर्व गोष्टी सर्वत्र समान पद्धतीने घडत आहेत. एखाद्या मुसलमानाने लव्ह जिहाद, धर्मांतर असा कोणताही गुन्हा केला की, त्याला संरक्षण देण्यासाठी मुसलमान संघटित होतात. गुन्हेगार मुसलमानांना मदरसा आणि मशिदी येथे आश्रय मिळतो. जिहादी आतंकवाद्यांना इतर मुसलमान घरात आश्रय देतात. न्यायालयात खटला लढवण्यासाठी गुन्हेगार मुसलमानांच्या पाठीशी अनेक मुसलमान अधिवक्ते उभे रहातात. मुसलमानांकडून गुन्हेगार मुसलमानांच्या कुटुंबांचा उदरनिर्वाह करण्याचे दायित्व घेतले जाते. लव्ह जिहाद खटल्यांतील धर्मांधांना सोडवण्यासाठी मुसलमान अधिवक्त्यांकडून शेवटपर्यंत प्रयत्न केले जातात. थोडक्यात धर्मांधांच्या प्रत्येक गुन्ह्याला झुकते माप देऊन त्याला वाचवण्यासाठी मुसलमान संघटित होतात. हा सर्व अधर्माचा भाग झाला. दुसरीकडे हिंदूंकडे पाहिल्यास, लव्ह जिहाद प्रकरणात अडकलेल्या हिंदु तरुणींना सोडवण्यासाठी ४-५ हिंदुत्वनिष्ठ वगळता कुणीही साहाय्य करण्यासाठी पुढे येत नाही. गोरक्षकांच्या संरक्षणासाठी कुणी पुढे येत नाही. एखाद्या धर्मांधाने हिंदूंवर अत्याचार केल्यास, हिंदु महिलांवर बलात्कार केल्यास किंवा विनाकारण एखाद्या हिंदूवर पोलिसांनी गुन्हा नोंद केल्यानंतर समाजातील किती हिंदु अधिवक्ते अत्याचार पीडित हिंदूंना वाचवण्यासाठी संघटित होतात ? हिंदूंनी कोणताही गुन्हा केलेला नसतांनाही पोलीस त्यांच्यावर गुन्हे नोंद करतात. या वेळीही समाजातील हिंदू संघटित होऊन अत्याचार झालेल्या हिंदूंच्या पाठीशी उभे रहात नाहीत. त्यामुळे हिंदूंनी समाजकंटक आणि धर्मांध यांच्यातील संघटित वृत्तीचा अभ्यास करून त्याप्रमाणे कृतीशील होणे आवश्यक आहे. म्हणजे हिंदूंनी धर्माच्या बाजूने कृती करणे अावश्यक आहे. यासाठी हिंदूंच्या संरक्षणासाठी हिंदु अधिवक्त्यांनी जात-पात विसरून गुन्हे नोंद झालेल्या हिंदूंच्या साहाय्यासाठी संघटित होणे, समाजकंटक आणि धर्मांध यांच्या अत्याचारांचा प्रतिकार करण्यासाठी हिंदूंना स्वसंरक्षण प्रशिक्षण देण्यासाठी प्रत्येक शहरात प्रशिक्षणवर्ग चालू करणे, धर्मावरील श्रद्धा दृढ होण्यासाठी धर्मशिक्षणवर्ग चालू करणे, अत्याचार झालेल्या हिंदूंना (म्हणजे शारीरिक इजा झाल्याने जे काही काम करू शकत नाहीत, असे हिंदू) साहाय्य करून त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचे दायित्व घेणे, हिंदूंवर उपचार करण्यासाठी हिंदु आधुनिक वैद्यांचे संघटन करून त्याप्रमाणे हिंदूंवर विनामूल्य उपचार करणे, हिंदु तरुणांना शिक्षण देण्यासाठी हिंदु शिक्षक आणि प्राध्यापक यांचे संघटन करणे, हिंदूंवर चांगले संस्कार होणे आणि हिंदूंनी साधना करून त्यांची आध्यात्मिक प्रगती होण्यासाठी संतांनी सांगितल्यानुसार साधना करणे अशा गोष्टी होण्यासाठी हिंदूंनी गुढीपाडव्याला तसा संकल्प करून प्रत्यक्ष त्या गोष्टी होण्यासाठी सतत प्रयत्न करणे आवश्यक आहे.

हिंदु राष्ट्रासाठी संघर्ष करावाच लागेल ! 

जगातील कोणताही पालट सहज होत नसतो. मनुष्य किंवा कुठलाही जीव, जंतू, प्राणी यांचा जन्म प्रसुतीवेदनेविना होत नसतो. सध्याचा काळ हा प्रसुतीवेदनेचा आहे. ही वेदना प्रत्येकाला सहन करावी लागणार आहे. यातूनच पुढे हिंदु राष्ट्र म्हणजे ईश्वरी राज्य, रामराज्य याची स्थापना होणार आहे. सध्याची देशाचीच नव्हे, तर संपूर्ण जगाची स्थिती पाहिली, तर चिंताजनक झाली आहे. जागतिक युद्धाचे ढग जमू लागले आहेत. रशिया आणि युक्रेन, तसेच इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध यांमुळे जागतिक युद्ध होण्याची शक्यता तज्ञांनी वर्तवली आहे. भारतातील ज्योतिषांच्या मते पुढील वर्षात भारतात आणीबाणी आणि युद्ध स्थिती निर्माण होऊ शकते. संतांनी आणि द्रष्टे यांनी सांगिल्यानुसार तिसरे महायुद्ध होऊन मोठा नरसंहार होणार आहे. त्यानंतर धर्माचे राज्य येणार आहे. त्यामुळे हा काळ मोठा कसोटीचा असणार आहे. या पार्श्वभूमीवर केवळ गुढी उभारून नववर्ष साजरे करून थांबता येणार नाही. हे नववर्ष सुखाचे आणि समाधानाचे असावे, ही स्थिती पुष्कळ लांब असेल; मात्र या वर्षांत जीवितरक्षण व्हावे, यासाठीच संघर्ष करावा लागणार आहे. तसा संघर्ष करण्याची मानसिकता निर्माण करून स्वतःचे अस्तित्व कसे टिकवता येईल, याचे नियोजन करून त्यानुसार वागावे लागेल.

ईश्वराला शरण जाऊन कृती करणे आवश्यक !

श्री हनुमानासह वानरांनी श्रीरामाला शरण जाऊन आणि भक्ती करून रावणराज्य नष्ट केले. पुढे द्वापरयुगात पांडवांनी श्रीकृष्णाला शरण जाऊन आणि श्रीकृष्णाच्या सत्संगाने प्रेरित होऊन कौरवांचा नाश केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी आई तुळजाभवानी, संत तुकाराम आणि समर्थ रामदासस्वामी यांना शरण जाऊन आणि त्यांचे आशीर्वाद घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. यातून हिंदूंनी प्रेरणा घेऊन येत्या येणार्‍या भीषण काळात तरून जाण्यासाठी प्रभु श्रीरामचंद्राला शरण जावे लागेल. तशी भक्ती निर्माण करण्याचा प्रयत्न या नववर्षाच्या पहिल्या दिवसापासून करावा लागेल. ‘न मे भक्तः प्रणश्यति ।’ (माझ्या भक्ताचा नाश होत नाही), असे भगवान श्रीकृष्णाने सांगितले आहे. त्यामुळे हिंदूंनो, भक्त बनून स्वतःचे, समाजाचे आणि देशाचे रक्षण करा !