इस्लामिक स्टेटमध्ये सहभागी होण्यासाठी जाणारा ‘आयआयटी गुवाहाटी’चा विद्यार्थी तौसिफ अली याला अटक

तौसिफ अली

गौहत्ती (आसाम) – ‘आयआयटी गुवाहाटी’चा विद्यार्थी तौसिफ अली इस्लामिक स्टेट या आतंकवादी संघटनेमध्ये सहभागी होण्यासाठी अफगाणिस्तानला जात असतांना त्याला कामरूप जिल्ह्यातील हाजो येथून अटक करण्यात आली. वसतीगृहातील त्याच्या खोलीत इस्लामिक स्टेटचा झेंडाही सापडला आहे. त्याला इस्लामिक स्टेटमध्ये सहभागी होण्यासाठी कसे आणि कुणी प्रवृत्त केले ?, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पोलीस त्याची चौकशी करत आहेत, तर गुप्तचर यंत्रणांनाही माहिती देण्यात आली आहे.

पोलीस अधिकार्‍याने सांगितले की, हा विद्यार्थी देहलीतील ओखला येथील रहिवासी आहे. तौसिफ अली इस्लामिक स्टेटमध्ये सहभागी होत आहे, अशी माहिती ई-मेलद्वारे पोलिसांना मिळाल्यावर त्यांनी तौसिफ याला शोधून अटक केली.

संपादकीय भूमिका

मुसलमान तरुण जिहादी आतंकवादी का बनू इच्छितात ?, हे मुसलमान संघटना, राजकीय नेते आणि त्यांचे पक्ष कधी सांगतील का ?