
कोल्हापूर – गेली कित्येक वर्षे पत्रकारांच्या घरकुलाच्या प्रकल्पाचा प्रश्न प्रलंबित होता. हा प्रश्न आता जवळपास मार्गी लागला असून लवकरच त्याच्या भूमीपूजनाचा कार्यक्रमही लवकर पार पडेल, अशी ग्वाही ‘कोल्हापूर प्रेसक्लब’चे अध्यक्ष श्री. शीतल धनवडे यांनी दिली. विद्यमान संचालक मंडळाने गतवर्षी चांगले काम केल्याने त्यांना परत १ वर्षाचा कालावधीत वाढवून देण्याचा निर्णय ‘कोल्हापूर प्रेसक्लब’च्या वार्षिक सभेत घेण्यात आला. त्या प्रसंगी ते बोलत होते. या सभेत ‘बी न्यूज’चे संपादक चारुदत्त जोशी, पत्रकार गुरुबाळ माळी, चंद्रकांत पाटील, लुमाकांत नलवडे, समीर मुजावर, रणजित माजगांवकर यांनी त्यांच्या सूचना मांडल्या. या प्रसंगी उपाध्यक्ष प्रशांत आयरेकर, सचिव बाबुराव, सुखदेव गिरी, शिवाजी यादव, संग्राम काटकर, भूषण पाटील यांसह पत्रकार, छायाचित्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कुसूर नळपाणीपुरवठा योजनेच्या ठेकेदाराला काळ्या सूचीत टाकले !
कुडाळ शहरातील संशयित बोगस डॉक्टरला पोलीस कोठडी
अकोल्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारा पोलीस पसार
सावंतवाडी रेल्वेस्थानकात ३ एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्यास विलंब : नागरिक संतप्त
मडगाव येथे दिवसाढवळ्या डॉक्टरचे अपहरण
वाशी येथे ‘जनसंवाद-विकास’ उपक्रमात नागरिकांच्या समस्या सोडवण्यावर भर