अनधिकृत मासेमारी केल्याचा आरोप
कोलंबो – श्रीलंकेच्या नौदलाने १५ मार्चला उत्तर जाफना द्वीपकल्पातील कराईनगरच्या किनार्याजवळ १५ भारतीय मासेमारांना अनधिकृत मासेमारी केल्याच्या आरोपाखाली कह्यात घेतले. श्रीलंके नौदलाने या मासेमारांच्या नौकाही कह्यात घेऊन त्या मत्स्य संचालनालयाकडे तपासणीसाठी पाठवल्या आहेत.
Sri Lankan Navy arrests 15 Indian fishermen !
Allegation of illegal fishing !#JaffnaPeninsula pic.twitter.com/vdHy1pvcdK
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) March 16, 2024
या वर्षी श्रीलंकेच्या नौदलाने आतापर्यंत १६ बोटींसह २२५ भारतीय मासेमारांना कह्यात घेतले आहे.