|
भाग्यनगर (तेलंगाणा) – उत्तर देहलीतील इंद्रलोक परिसरात ८ मार्चच्या दुपारी रस्त्यावर नमाजपठण करणार्यांना पोलीस उपनिरीक्षक मनोज तोमर यांनी लाथ मारून उठवले. याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात प्रसारित झाला असून मुसलमानांनी याला विरोध केला. त्यामुळे तोमर यांना देहली पोलिसांनी निलंबित केले. यासंदर्भात भाजपचे भाग्यनगर येथील प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजासिंह यांनी मनोज तोमर यांचे समर्थन केले आहे. ते म्हणाले की, देशभरात ६ लाख मशिदी असूनही रस्ते अडवून नमाजपठण करण्यात कोणता शहाणपणा आहे ? या प्रकरणी देहली पोलिसांना माझा पूर्ण पाठिंबा आहे. पोलिसांनी (मनोज तोमर यांनी) कोणतीही चूक केलेली नाही.
देश भर में 6 लाख मस्जिदों के बावजूद सड़क जाम करके नमाज़ अदा करना कौन सी समझदारी है?
इस मामले में मेरा पूरा समर्थन @DelhiPolice के साथ है। पुलिस ने कुछ गलत नहीं किया है।
— Raja Singh (Modi Ka Parivar) (@TigerRajaSingh) March 8, 2024
८ मार्च, शुक्रवारच्या नमाजपठणाच्या वेळच्या घटनेचा निषेध करण्यासाठी तेथील मुसलमानांनी ‘रस्ता बंद’ आंदोलन केले. प्रकरण तापल्याने तोमर यांना निलंबित करण्यात आले. या एकूण प्रकरणावरून गेले २४ घंट्यांत ‘एक्स’वरून पुष्कळ चर्चा होत आहे. ‘#IStandWithManojTomar’, ‘दिल्ली पुलिस’, ‘रोड जाम’, ‘मनोज तोमर’ अशा विविध ‘हॅशटॅग’ आणि ‘कीवर्ड्स’ यांनी सहस्रावधी हिंदूंनी मनोज तोमर यांचे समर्थन केले आहे. दुसरीकडे काही धर्मांध, तसेच काँग्रेस आणि कथित धर्मनिरपेक्षतावादी यांनी मुसलमानांचे समर्थन करत पोलिसांच्या कृतीला चुकीचे ठरवले.
Incident in Capital: Police officer kicks individuals performing Namaz
'With over 6 lakhs mosques nationwide, what wisdom is there in obstructing roads for Namaz?' questions BJP MLA @TigerRajaSingh
➡️Rajasingh backs Delhi Police's action.
➡️Congress denounces Delhi Police's… pic.twitter.com/Ejq8VRTcKM— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) March 9, 2024
मुसलमानांचे लांगूलचालन करणारे काही काँग्रेसी !
- काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया श्रीनेट म्हणाल्या, ‘हे (लाथ मारल्याचे कृत्य) अमित शाह यांच्या देहली पोलिसांचे ब्रीदवाक्य आहे – ‘शांतता, सेवा, न्याय’. यासाठी ते पूर्ण झोकून देऊन काम करत आहेत.’
- काँग्रेसचे नेते इम्रान प्रतापगढी म्हणाले, ‘हा द्वेष का आहे ? या व्यक्तीला कदाचित् मानवतेची तत्त्वे समजत नाहीत.’
- देहली काँग्रेसने म्हटले की, ‘फारच लज्जास्पद ! रस्त्यावर नमाजपठण करणार्या लोकांना देहली पोलीस लाथ मारत आहेत. यापेक्षा लज्जास्पद काय असू शकते ?’
घटनेचा अर्धवट व्हिडिओ प्रसारित करून लोकांना भडकावले जात आहे ! – सामाजिक माध्यमांतून टीका
सामाजिक माध्यमांत एका व्यक्तीने या घटनेचा दीड मिनिटांचा व्हिडिओ शेअर करत लिहिले आहे की, जेव्हा रस्त्यावर नमाजपठणासाठी काही लोक एकत्र आले होते, तेव्हा त्यांना दूर जाण्यास सांगण्यात आले; पण ते एकत्र आले आणि नंतर त्यांनी पोलिसांना जिवे मारण्याची धमकी दिली. अर्धवट व्हिडिओ प्रसारित करून लोकांना भडकावून पोलिसांना दोषी ठरवले जात आहे.
चंदन शर्मा नावाच्या एकाने लिहिले आहे की, उपनिरीक्षक मनोज तोमर यांना जमावाकडून वारंवार चिथावणी दिली जात होती.
रस्त्यावर नमाजपठण करणे गुन्हा नव्हे का ? – अधिवक्ता विनीत जिंदाल, सर्वोच्च न्यायालय
सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता विनीत जिंदाल यांनी या प्रकरणावर स्वत:चे मत मांडणारा व्हिडिओ प्रसारित केला आहे. यात त्यांनी काही महत्त्वपूर्ण प्रश्न उपस्थित केले आहेत. ते पुढील प्रमाणे आहेत.
१. देहलीतील रस्त्यावर नमाजपठण करणार्या लोकांना असंवेदनशील पद्धतीने हटवणार्या देहली पोलिसांच्या अधिकार्यावर कारवाई झाली, परंतु रस्ता रोखून नमाजपठण करणे योग्य आहे का ?
२. रस्त्यावर बेकायदेशीर पद्धतीने नमाजपठण करणार्या लोकांवर गुन्हा नोंद केला गेला का ?
३. रस्ता बंद करून लोकांचे प्राण संकटात टाकणे, हा गुन्हा नव्हे का ?
दिल्ली में सड़क पर नमाज़ पढ़ रहे लोगो को असंवेदनशील तरीक़े से हटाने पर दिल्ली पुलिस के अधिकारी पर तो कारवाही हो गई पर सवाल ये भी है कि क्या सड़क रोक कर नमाज़ पढ़ना सही है?
सड़क पर ग़ैर क़ानूनी रूप से नमाज़ पढ़ने पर क्या इन लोगो पर FIR दर्ज की गई?
सड़क रोक कर जाम लगना, लोगो की… pic.twitter.com/pQgMcBKnxv
— Adv.Vineet Jindal (@vineetJindal19) March 8, 2024
अधिवक्ता जिंदाल पुढे म्हणाले की, मी देहली पोलिसांकडे आग्रह करतो की, त्यांनी बेकायदेशीर पद्धतीने रस्ता रोखून, वाहतुकीत अडथळे निर्माण करून पोलीस अधिकार्यावर आक्रमण करणार्यांच्या विरोधात गुन्हा नोंद करावा !
संपादकीय भूमिका
|