परराष्ट्र धोरण विश्लेषक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांचे चालू आंतरराष्ट्रीय घडामोडींवरील भाष्य !

रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम : युरोपसाठी भारत बनत आहे निर्यातदार !

डॉ. शैलेंद्र देवळाणकर

रशिया-युक्रेन युद्धाला २ वर्षे उलटली. सर्वाधिक आर्थिक हानी कुणाची झाली असेल, तर ती पश्चिम युरोपची ! अमेरिकेने घातलेल्या निर्बंधामुळे युरोपला रशियाकडून तेलही विकत घेता येत नाही आणि व्यापारही करता येत नाही. अशा वेळी युरोपला तारले भारताने ! भारत बनला युरोपचा सर्वांत मोठा तेल पुरवठादार ! आता…भारत पुरवणार युरोपला युद्ध साहित्य जे युरोपियन देश युक्रेनला पुरवतील. युरोपसाठी भारत बनत आहे तेल आणि युद्ध साहित्य यांचा निर्यातदार !


भारत लवकरच अर्थव्यवस्थेत तिसर्‍या क्रमांकावर जाण्याची शक्यता !

देशाची अर्थव्यवस्था

जगातील सर्वांत मोठ्या अर्थव्यवस्थांच्या सूचीत भारत ५ व्या क्रमांकावर आहे; (प्रथम अमेरिका, दुसर्‍या क्रमांकावर चीन, नंतर जपान आणि चौथ्या क्रमांकावर जर्मनी आहे.) पण जपानच्या अर्थव्यवस्थेला उतरती कळा लागल्याने मागच्या आठवड्यात जपान हा तिसर्‍या क्रमांकाहून ४ क्रमांकावर आणि जर्मनी ३ र्‍या क्रमांकावर आला आहे. असे असले, तरी जर्मन अर्थव्यवस्थेसाठी सध्या सर्वांत वाईट काळ चालू आहे. सध्या केवळ ५ क्रमांकावरच्या भारताचा विकासदर जगात सर्वाधिक आहे. त्यामुळे जपान आणि जर्मनी यांना मागे टाकून भारत लवकरच तिसर्‍या क्रमांकावर जाण्याची शक्यता आहे.

(डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांच्या फेसबुकवरून साभार)