![]()
आगमानां हि सर्वेषां आचारः श्रेष्ठः उच्यते ।
आचारप्रभवो धर्मः धर्मात् आयुः विवर्धते ॥
अर्थ : सर्व शास्त्रांत आचार श्रेष्ठ सांगितला आहे. धर्म आचारातून निर्माण होतो. धर्माच्या आचरणाने आयुष्य वाढते.
कौरव-पांडव लहानपणी द्रोणाचार्यांच्या आश्रमात शिकायला गेले. पहिल्या दिवशी द्रोणाचार्यांनी पाठ दिला, ‘सत्यं वद ।’ आणि सांगितले, ‘उद्या हे पाठ करून या.’ दुसर्या दिवशी सर्वांनी पाठ म्हणून दाखवले. कौरवांचे तर लगेच पाठ झाले; कारण लबाडांना धर्म लवकर पाठ होतो. एकटा धर्मराजा म्हणाला, ‘गुुरुदेव, ‘सत्यं वद’ हे जोपर्यंत माझ्या आचरणात येत नाही, तोपर्यंत ते पाठ झाले, असे म्हणणे व्यर्थ नाही का ?’ धर्माची तत्त्वे आचरणात असावी लागतात.
उत्तरदायी पोलिसांना शिक्षा करा !
माझा आत्माच माझे अंतिम ध्येय !
श्री विठ्ठल : तत्त्वज्ञानाचे आराध्यदैवत !
अद्वैतवादाविषयी करण्यात आलेला खोटा प्रचार
‘कोणतेही कार्य क्षुद्र नाही’, हे ध्यानात ठेवा !