अनधिकृत मशिदीचे बांधकाम हटवण्यात आले !

ऐरोली येथे सकल हिंदु समाजाच्या पाठपुराव्याचा परिणाम !

नवी मुंबई, २७ फेब्रुवारी (वार्ता.) – ऐरोली येथे महापालिकेचे मैदान आणि उद्यान यांसाठी राखीव असलेल्या भूखंडावर अनधिकृत मशिद बांधण्यात आली होती. या प्रार्थनास्थळावर कारवाई करण्यासाठी सकल हिंदु समाजाच्या माध्यमातून महापालिका आणि सिडको यांच्याकडे वर्ष २०१२ पासून पाठपुरावा करण्यात येत होता. आता हे अनधिकृत मशिदीचे बांधकाम हटवण्यात आले आहे. नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या आदेशाने आणि उपायुक्त डॉ. राहुल गेठे यांच्या मार्गदर्शनाखाली ऐरोली विभागाचे साहाय्यक आयुक्त अशोक अहिरे आणि त्यांच्या अतिक्रमणविरोधी पथकाने कारवाईची नोटीस बजावून पहाटे कारवाईची सिद्धता करण्यात आली होती; पण कारवाईचा धसका घेत अतिक्रमणधारक संस्थेच्या पदाधिकार्‍यांनी स्वतःच रातोरात प्रार्थनास्थळाची अनधिकृत शेड आणि बांधकाम काढले अन् महापालिकेचा भूखंड मोकळा करून दिला.

१. ऐरोलीमध्ये सेक्टर ३ येथे वर्ष २०१२ पासून अनधिकृत प्रार्थनास्थळ (मशीद आणि मदरसा) होता. पालिकेच्या उद्यान आणि मैदान यांसाठी राखीव जागेवर हे बांधकाम करण्यात आले होते.

२. त्यावर कारवाई करण्यासाठी सकल हिंदु समाजाच्या वतीने महापालिका आणि सिडको यांच्याकडे पाठपुरावाही केला गेला; पण कारवाई होत नसल्याने ९ डिसेंबरला सकल हिंदु समाजाच्या वतीने ऐरोली विभाग कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता.

३. १२ डिसेंबर या दिवशी उपायुक्त राहुल गेठे यांनी २० दिवसांत प्रार्थनास्थळावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते; परंतु त्यानंतरही कारवाईला विलंब झाला. त्यामुळे सकल हिंदु समाजाच्या वतीने १६ फेब्रुवारी या दिवशी ऐरोलीचे विभाग अधिकारी अशोक अहिरे यांना विभाग कार्यालयात घेराव घालून ठिय्या आंदोलन करण्यात आले. रात्री ३ पर्यंत आंदोलन चालू होते. पोलिसांनी मध्यस्थी करून कारवाईचे आश्वासन दिले. त्यामुळे तात्पुरते ठिय्या आंदोलन स्थगित करण्यात आले.

४. २४ फेब्रुवारीपर्यंत कारवाई न झाल्यास अधिक तीव्र आंदोलन करण्यात येईल, अशी चेतावणीही देण्यात आली होती. महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी विभागाच्या माध्यमातून संबंधित अतिक्रमणधारक संस्थेच्या विरोधात फौजदारी गुन्हा नोंद करण्यात आला होता. त्यानंतर वरील प्रक्रिया करण्यात आली. आता तेथे उद्यानाची निर्मिती करण्यात येणार आहे.

संपादकीय भूमिका 

  • बेकायदेशीर बांधकामे हटवण्यासाठी हिंदूंना वारंवार चेतावणी द्यावी लागणे दुर्दैवी असल्याने हिंदु राष्ट्राची स्थापना अनिवार्य !
  • हिंदु संघटनांनी अशाच प्रकारे संघटित होऊन धर्मावर होणार्‍या आघातांविरोधात कृतीशील व्हावे आणि हिंदु राष्ट्राची स्थापना करावी !