१. निर्विचार जपाविषयी पूर्वसूचना मिळणे
‘१३.५.२०२१ च्या सकाळी मी ध्यान करत असतांना माझ्या मनात ‘निर्विचारदेवाय नमः । हा जप करावा का ?’, असा विचार आला आणि लगेचच ‘निर्विचार’ असा कुणी देव नाही’, असा दुसरा विचार आला.
त्यानंतर ३ दिवसांनी, म्हणजे १६.५.२०२१ या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये ‘निर्विचार’ या जप करण्यासंदर्भात सूचना आली. तेव्हा देवाने मला जपाविषयी पूर्वकल्पना दिली होती’, असे मला वाटले आणि मला माझे चुकल्याचे लक्षात आले.
२. निर्विचार असा जप करतांना आलेल्या अनुभूती
अ. जप करतांना माझे हात, पाठ इत्यादी शारीरिक दुखणी मला जाणवत नाहीत.
आ. श्रीकृष्ण अर्जुनाला (गीता सांगणे) उपदेश करत असतानांचा प्रसंग माझ्या डोळ्यांसमोर दिसत रहातो.
इ. सेवा करतांना निर्विचार हा जप केल्यावर मला मनाची एकाग्रता साधता येते.
ई. हा जप चालू केल्यापासून मला सेवेत आनंद मिळू लागला आहे.
ही अनुभूती दिल्याविषयी मी भगवान श्रीकृष्णाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करून हे लिखाण परम पूज्य गुरुमाऊली आपल्या चरणी कृतज्ञतापूर्वक अर्पण करतो.’
– श्री. नंदकिशोर दत्तात्रेय नारकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |