विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी छायाचित्रे आणि व्हिडिओ पोस्ट करून दिली माहिती !
हावडा (बंगाल) – जिल्ह्यातील ब्रांका येथे हिंदूंच्या ५ मंदिरांची तोडफोड झाल्याचे वृत्त आहे. भाजपचे नेते आणि विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी त्यांच्या ‘एक्स’ खात्यावर तोडफोड करण्यात आलेल्या मंदिरांची छायाचित्रे आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. या व्हिडिओमध्ये टोप्या घातलेले काही लोक मंदिरांची हानी करतांना दिसत आहेत. या घटनेमुळे संतप्त झालेल्या हिंदु संघटनांनी तोडफोड करणार्यांना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली आहे.
Last night miscreants vandalised 5 Sanatani Temples at Bankra; Howrah.
The locals as a mark of protest are bolckading rail lines.
I am requesting Shri Praveen Kumar Tripathi (IPS); Commissioner of @hwhcitypolice and DGP @WBPolice to arrest the culprits as quickly as possible.… pic.twitter.com/mSyikSIEmS— Suvendu Adhikari • শুভেন্দু অধিকারী (@SuvenduWB) February 26, 2024
१. सुवेंदू अधिकारी यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, काल रात्री समाजकंटकांनी बांक्रा येथील ५ सनातनी मंदिरांची तोडफोड केली आहे. स्थानिक लोक रेल्वे वाहतूक बंद करत आहेत. मी हावडा पोलीस आयुक्त प्रवीण कुमार त्रिपाठी आणि पोलीस महासंचालक यांना विनंती करतो की, त्यांनी या घटनेतील दोषींना लवकरात लवकर अटक करावी.
Vandalism at 5 Hindu temples in Howrah, Bengal during Muslim festival night, opposition leader Suvendu Adhikari shares photos and videos.
In Bengal, the perpetrators of temple vandalism are well-known, making it unnecessary to specify.
The continuation of such incidents is… pic.twitter.com/gJIDl1rBLt
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) February 27, 2024
२. सुवेंदू अधिकारी यांनी शेअर केलेल्या छायाचित्रांमध्ये देवतांच्या मूर्ती तुटलेल्या अवस्थेत दिसत आहेत. चंदन, फुले आदी अस्ताव्यस्त विखुरलेली आहेत. लोक रेल्वे रुळावर भगवे झेंडे घेऊन उभे असल्याचे दिसत आहे. या आंदोलनकर्त्यांमध्ये महिला आणि लहान मुले यांचाही समावेश आहे. १ मिनिट ४५ सेकंदाच्या व्हिडिओमध्ये टोप्या घातलेल्या लोकांचा संपूर्ण समूह दिसतो. हे सर्व जण रात्रीच्या वेळी मंदिरांची तोडफोड करतांना दिसतात. तोडफोडीची ही घटना शब-ए-बारात (मुसलमानांचा सण) वेळी घडल्याचे समजते. बंगाल पोलिसांच्या कार्यशैलीमुळे हिंदूंना वारंवार लक्ष्य केले जात आहे. तणावाची परिस्थिती पहाता घटनास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
(ही छायाचित्रे / व्हिडिओ देण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नसून सर्वांना वस्तूस्थिती कळावी, या उद्देशाने हे प्रसिद्ध केले आहेत. – संपादक)
संपादकीय भूमिकाबंगालमध्ये हिंदूंच्या मंदिरांची तोडफोड कोण करणार, हे वेगळे सांगायला नको ! बंगालमध्ये जोपर्यंत राष्ट्रपती राजवट लावली जात नाही, तोपर्यंत असेच घडत रहाणार ! |