मुंबई, २५ फेब्रुवारी (वार्ता.) – मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या आम्ही मान्य केल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी अवघ्या १५ दिवसांत अडीच कोटी लोकांचे सर्वेक्षण करून पूर्ण अभ्यासांती मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. एवढ्या अल्प दिवसांमध्ये एवढ्या मोठ्या संख्येने लोकांचे सर्वेक्षण करणे, हे राज्यातच नव्हे, तर देशात प्रथमच घडले आहे. त्यामुळे हे आरक्षण टिकेलच, असा आमचा विश्वास आहे, असे प्रतिपादन शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत केले.
आम्ही दिलेले आरक्षण मराठा समाजालाही मान्य आहे. आता सगेसोयरे शब्दावरून जे प्रश्न उपस्थित केले जात आहेत, त्याविषयी तोडगा काढला जात आहे. मोठ्या संख्येने आलेल्या हरकतींवर मार्ग काढायला किमान एक मास लागेल. तोपर्यंत सर्वांनी संयम राखायला हवा, असेही आवाहन त्यांनी केले.