साधकांना सूचना
‘बर्याच वेळा साधकांना अन्य साधकांची गुणवैशिष्ट्ये, तसेच साधनेमुळे त्यांच्यात झालेले वैशिष्ट्यपूर्ण पालट लक्षात येतात. ‘काही साधकांकडून साधनेचे चांगले प्रयत्न होत असून ‘त्यांची आध्यात्मिक उन्नती होत आहे’, असेही काही जणांच्या लक्षात आलेले असते. काही साधकांना इतरांची आध्यात्मिक उन्नती झाल्याविषयीच्या पूर्वसूचना मिळालेल्या असतात. असे असतांना साधक संबंधित साधकांविषयीचे वैशिष्ट्यपूर्ण लिखाण तत्परतेने लिहून देत नाहीत. त्यामुळे ‘सनातन प्रभात’मध्ये हे लिखाण त्या त्या वेळी प्रसिद्ध करता येत नाही.
मध्यंतरी बर्याच साधकांनी चांगले साधक आणि वयस्कर संत यांच्याविषयीचे वैशिष्ट्यपूर्ण लिखाण त्यांच्या निधनानंतर लिहून दिले. त्यामुळे ते हयात असतांना त्यांची गुणवैशिष्ट्ये ‘सनातन प्रभात’मधून प्रसिद्ध करून त्यांचे कौतुक करता आले नाही. ते हयात असतांना त्यांचे लिखाण प्रसिद्ध झाले असते, तर त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना आनंद मिळाला असता, तसेच अन्य साधकांना त्यांच्याकडून शिकताही आले असते.
साधकांनी यापुढे चांगले साधक आणि संत यांच्याविषयीचे वैशिष्ट्यपूर्ण लिखाण, प्रसंग अन् संतांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती नेमकेपणाने आणि तत्परतेने लिहून पाठवाव्यात.’
– श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२४.२.२०२४)