Taliban Convicts Publicly Executed : हत्येच्या प्रकरणातील दोषींना तालिबानने सार्वजनिक ठिकाणी गोळ्या झाडून केले ठार !

प्रातिनिधिक छायाचित्र

काबूल (अफगाणिस्तान) – अफगाणिस्तानातील गझनी शहरात तालिबान शासनाने एका हत्येच्या प्रकरणी २ दोषींना सार्वजनिक ठिकाणी सहस्रो लोकांच्या समोर गोळ्या झाडून ठार केले. या गुन्हेगारांनी ज्यांना ठार मारले होते, त्यांच्या नातेवाइकांनी येथील फुटबॉल स्टेडियममध्ये अगदी जवळून त्यांना १५ गोळ्या झाडून ठार केले.

उपस्थितांना या वेळी भ्रमणभाष किंवा कॅमेरा जवळ ठेवण्याची अनुमती देण्यात आली नव्हती. वर्ष २०२१ मध्ये तालिबान सत्तेत परतल्यानंतर ही तिसरी वेळ होती, जेव्हा दोषींना सार्वजनिकरित्या शिक्षा झाली. संयुक्त राष्ट्रांनी याला ‘मानवाधिकारांचे उल्लंघन’ म्हटले आहे.