उत्तराखंडमध्ये ‘लव्ह जिहाद’चे नवीन प्रकरण उजेडात !
काशीपूर (उत्तराखंड) – उत्तराखंडमधील काशीपूर भागात ‘लव्ह जिहाद’चे नवीन प्रकरण समोर आले आहे. शिकवणी वर्गाला जाणार्या दोन हिंदु बहिणींवर फरदीन आणि रौफ नावाच्या दोन मुसलमान तरुणांनी धारदार शस्त्रांद्वारे आक्रमण केले. यापूर्वी पीडित हिंदु विद्यार्थिंनीपैकी एकीचा विनयभंग केल्याच्या प्रकरणी फरदीनला कारागृहात टाकणात आले होते. तो जामिनावर बाहेर आला होता. फरदीन आणि त्याचे कुटुंबीय यांनी पीडित विद्यार्थिनीवर विनयभंगाची तक्रार मागे घेण्यासाठी दबाव आणला होता; मात्र पीडित मुलीने त्यास नकार दिल्याने आरोपींनी हे जीवघेणे आक्रमण केले. यामध्ये १७ वर्षीय अल्पवयीन हिंदु मुलगी गंभीररित्या घायाळ झाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी फरदीन आणि रौफ यांना अटक केली आहे.
१. या आक्रमणानंतर आरोपी फरदीनचे कुटुंबीय आणि नातेवाईक पीडित मुलींच्या घरी पोचले. त्यांनी पीडितेच्या पालकांना धमकावले आणि फरदीनवरील गुन्हा मागे घेण्यासाठी दबाव आणला.
२. हिंदु विद्यार्थिंनीवर झालेल्या आक्रमणाची माहिती मिळताच हिंदु संघटनांच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाणे गाठून आरोपींना अटक करण्याची मागणी केली.
३. पोलिसांनी आरोपींच्या विरोधात गुन्हा नोंदवला असून दोन्ही त्यांना अटक केली आहे. या प्रकरणी पुढील अन्वेषण चालू आहे, अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक प्रदीप मिश्रा यांनी दिली.
A new case of 'Love J!h@d' has come to light in Uttarakhand.
Mu$|!m youth assaults a Hindu girl with sharp weapons for refusing to withdraw the molestation complaint.
👉 This proves that such fanatics have no fear for the Police or the Government. It's an embarrassment to the… pic.twitter.com/5xgsOhlPKn
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) February 14, 2024
संपादकीय भूमिकायावरून अशा धर्मांधांना पोलीस आणि सरकार यांचा जराही धाक उरला नसल्याचे सिद्ध होते ! पोलिसांना हे लज्जास्पद ! |