आळंदी (जिल्हा पुणे), ११ फेब्रुवारी (वार्ता.) – प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांच्या ‘गीताभक्ती अमृत महोत्सवा’निमित्त १० फेब्रुवारी या दिवशी सकाळी ८ वाजता ‘आळंदी क्षेत्र प्रदक्षिणा’ करण्यास प्रारंभ करण्यात आला. वाजतगाजत निघालेल्या ‘आळंदी क्षेत्र प्रदक्षिणे’चा प्रारंभ कार्यक्रमाच्या मुख्य मंडपापासून होऊन शेवटही येथेच करण्यात आला. फेरीच्या आरंभी वाजंत्री, प्रभु श्रीराम, सीता, लक्ष्मण आणि हनुमान यांची प्रतिकात्मक वेशभूषा करून बालके घोड्यांवर बसून फेरीमध्ये सहभागी झाली होती. त्यानंतर ‘वेदपाठशाळे’तील छात्र, महिला आणि भक्तगण मोठ्या संख्येने सामील झाले होते. श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे आळंदी गावामध्ये ठिकठिकाणी फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये स्वागत करण्यात येत होते.