आनंद पार्क येथील चौकाचे ‘धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज चौक’ असे नामकरण !

आनंद पार्क येथे नामकरण करण्यात आलेला ‘धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज चौक’

सांगली – अभयनगर येथील आनंद पार्क येथील चौकाचे ‘धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज चौक’ असे नामकरण करण्यात आले. येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने धर्मशिक्षणवर्ग चालू असून वर्गात येणार्‍या युवकांनी नामकरणाच्या कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला. यात धर्मप्रेमी सर्वश्री महेश चव्हाण, गणेश सगरे, अभिजित कोडग, प्रथमेश बावडेकर, शुभम होसमट, रवींद्र ढगे सर, मंगेश चव्हाण, विनायक पाटील यांचा पुढाकार होता. हे सर्व धर्मप्रेमी विविध धर्मकार्यात सहभागी असतात.

नामकरण सोहळ्याच्या प्रसंगी उपस्थित धर्मप्रेमी, तसेच मान्यवर

या नामकरण सोहळ्यास श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी, भाजप आमदार श्री. सुधीर गाडगीळ, माजी आमदार श्री. नितीन शिंदे, भाजपचे श्री. शेखर इनामदार, श्री. दिनकर पाटील यांसह मान्यवर उपस्थित होते. सोहळ्यात नामफलकाचे अनावरण झाल्यावर भगव्या ध्वजाच्या स्तंभाचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. या सोहळ्यासाठी आसपासच्या भागातील नागरिक उत्साहाने सहभागी झाले होते.