फरिदाबाद आणि मथुरा येथे श्रीराममूर्ती प्राणप्रतिष्ठेनिमित्त पार पडले ‘श्रीराम नामसंकीर्तन’ अभियान !

श्रीरामाचा नामजप, मार्गदर्शन, रामराज्यासाठी प्रार्थना आणि प्रतिज्ञा करण्यात आली !

फरिदाबाद (हरियाणा) – अयोध्या येथील श्रीराममूर्ती प्राणप्रतिष्ठेनिमित्त मथुरा आणि फरिदाबाद येथे विविध ठिकाणी श्रीराम नामसंकीर्तन अभियान आयोजित करण्यात आले होते. या वेळी श्रीरामाचा जप, मार्गदर्शन, रामराज्यासाठी (हिंदु राष्ट्रासाठी) प्रार्थना आणि प्रतिज्ञा घेण्यात आली. या विविध कार्यक्रमांमध्ये श्रीरामाच्या नामपट्ट्यांचे मोठ्या प्रमाणात वितरण करण्यात आले.

१. मथुरा येथील कंकालीदेवीच्या मंदिरामध्ये श्रीराम नामजपाचे आयोजन करण्यात आले होते. याचा अनेक भाविकांनी लाभ घेतला.

२. फरिदाबाद येथे ‘नवधा भक्ति विधी चॅरिटेबल ट्रस्ट’च्या वतीने आयोजित एका कार्यक्रमामध्ये सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथ आणि फ्लेक्स प्रदर्शन लावण्यात आले होते. या वेळी उपस्थितांना श्रीरामाची गुणवैशिष्ट्ये आणि रामराज्य यांविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

३. फरिदाबाद येथे सनातन धर्म मंदिर येथे श्रीरामाची वैशिष्ट्ये सांगण्यात आली, तसेच उपस्थित भक्तांकडून श्रीरामाचा नामजप करून घेण्यात आला. याचा अनेक भक्तगणांनी लाभ घेतला.

४. फरिदाबादमधील सेक्टर २८ येथे असलेल्या शिवशक्ती मंदिराची स्वच्छता करण्यात आली. या मंदिरासह श्रीसिद्ध पीठ हनुमान मंदिर आणि वैष्णोमाता मंदिर येथे ‘हिंदु राष्ट्रा’साठी प्रार्थना अन् प्रतिज्ञा घेण्यात आली. याचा लाभ १ सहस्रांहून अधिक लोकांनी लाभ घेतला.

‘नवधा भक्ति विधी चॅरिटेबल ट्रस्ट’च्या कार्यक्रमामध्ये सनातन संस्थेच्या वतीने लावण्यात आलेले ग्रंथप्रदर्शन

क्षणचित्रे

१. मथुरा येथील शिवासा सोसायटीमध्ये प्राणप्रतिष्ठेनिमित्त निघालेल्या फेरीमध्ये नामपट्ट्या वितरित करण्यात आल्या. त्या घेतल्यानंतर लोक नामपट्ट्यांना नमस्कार करत ‘जय श्रीराम’च्या घोषणा देत होते.

२. सैनिक कॉलनी, फरिदाबाद येथील मंजू धीमान यांनी अनेक नामपट्ट्या वितरित केल्या.

३. फरिदाबादमध्ये श्रीराम नामपट्ट्यांचे मोठ्या प्रमाणात वितरण करण्यात आले.